Home नागपूर श्री भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर आम आदमी पार्टी...

श्री भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर आम आदमी पार्टी नागपूर द्वारे विविध ठिकाणी मिठाई वितरण कार्यक्रमाचे आयोज;

21 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

*श्री भगवंत मान यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर आम आदमी पार्टी नागपूर द्वारे विविध ठिकाणी मिठाई वितरण कार्यक्रमाचे आयोजन*
आम आदमी पार्टी नागपूरच्या वतीने पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आणि श्री भगवंत मान यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या आनंदात शहरातील विविध चौकाचौकात नागरिकांना मिठाईचे वाटप केले. यामध्ये आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले
दिल्लीपाठोपाठ पंजाबमध्येही दणदणीत विजयानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. नागपुरातही जनतेने आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांना मतदानाचे आश्वासन दिले आणि आम आदमी पार्टी जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पंजाबमधील विजयामुळे आम आदमी पक्षाला आता राष्ट्रीय पर्याय म्हणून लोकांनी स्वीकारले आहे. तुमचा झाडू घेऊन लोकांना राजकारणाचा घोळ साफ करायचा आहे, याचेच हे स्पष्ट संकेत आहे.
नागपूर विधानसभा व प्रभाग स्तरावर संघटनेची पूर्ण तयारी असून आगामी महानगरपालिका व विधानसभा निवडणुका पूर्ण ताकदीने व उत्साहाने लढण्यासाठी पक्ष सज्ज असल्याचे विदर्भ अध्यक्ष डॉ.देवेंद्र वानखडे यांनी सांगितले. ‘आप’ पूर्ण क्षमतेने, ताकदीने आणि आत्मविश्वासाने नागपुरातील जनतेला तिसरा पर्याय देईल आणि दिल्ली मॉडेल सर्वसामान्यांपर्यंत घेऊन जाईल, असे ते म्हणाले. नागपूर महापालिकेत आम आदमी पक्षाचे आगमन झाल्याने आता कल्याणकारी कारभार होणार आहे. आम आदमी पार्टी बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेनुसार सर्वांना समान अधिकार मिळावेत यासाठी नागपुरातील प्रत्येक वस्तीत सशक्त संघटन उभारणीचे काम तत्काळ सुरू करण्यात येणार असून पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला यात सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमस्थळी भाजप आणि काँग्रेसमधून आलेल्या अनेक सहकाऱ्यांनी ‘आप’चे सदस्यत्व घेतले.
गोलीबार चौक मध्य नागपुर येथे श्री नीलेश गोयल, श्री प्रभात अग्रवाल, श्री दांडेकर, श्री धकाते, श्री बरपात्रे, श्री वेलेकर व इतर पदाधिकारी यांनी कार्यक्रम केला.
जगनाडे चौक पूर्व नागपुर येथे श्री राकेश उराडे, श्री नामदेव कामदी यांच्या नेतृत्वात कार्यक्रम पाए पडला.
अंजनी चौक, दक्षिण पश्चिम नागपुर श्री जगजीत सिंग, डॉ. देवेंद्र वानखेडे, कविता सिंगल, अजय धर्मे, विनोद अलमडोहकर, प्रमोद नाईक, संतोष वैद्य, दिलीप बिडकर, मंगेश डांगरे प्रवीण चौधरी, संजय बलमे, कुंदन कानफाडे, संजय रेवतकर उपस्थित होते.
तुकडोजी चौक, दक्षिण नागपुर डॉ जाफरी,  सचिन पारधी, निखिल मेढवाड़े,
उत्तर नागपुर इंदोरा चौक येथे श्री शंकर इंगोले, रोशन डोंगरे, अर्चना राले, कविता सिंग, कविता उके, सारंग शेंडे, विशाल वैद्य, सुहेल गणवीर, राकेश अंबादे, अंकित देशभरतार, अखिल बोधकर, धीरज पाटील, आर्यन डोंगरे, शुभम डोंगरे, साधना वाघमारे, मयूर गेडाम, पियूष दहात, राहुल डोंगरे, तर प्रभाग क्र. १३ तर्फे लष्करीबाग मध्ये बूंदी वाटप श्रीमती विजया वैद्य (लष्करीबाग वार्ड – अध्यक्ष) यांच्या नेतृत्वात बूंदी वाटप करुण आंनद साजरा करण्यात आला.
      या दरम्यान प्रभाग १३ चे अध्यक्ष श्री. पंकज मिश्रा, वैशाली पाटील, सुनीता वैद्य उपस्थित होते.
अवस्थी चौक पश्चिम नागपुर येथे श्री शंकर इंगोले, श्री सुभाष बांते, आकाश कावले, श्री बिड़वाईकजी, यांच्या नेतृत्वात बूंदी वाटप कार्यक्रम पार पडला.