Home नागपूर जलतरणपटू प्रभाकर साठेची राज्य मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्ण कामगिरी..

जलतरणपटू प्रभाकर साठेची राज्य मास्टर्स जलतरण स्पर्धेत सुवर्ण कामगिरी..

49 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

मास्टर्स गेम्स असोसिएशन महाराष्ट्र द्वारा द्वितीय महाराष्ट्र राज्यस्तरीय मास्टर्स जलतरण स्पर्धा धुळे येथे 13 मार्च 22 रोजी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत नागपूरचे जलतरणपटू प्रभाकर साठेनी 75 ते 80 या वयोगटात सहभागी होऊन 50 मीटर, 100 मीटर, आणि 200 मीटर बॅक स्ट्रोक मध्ये प्रथम क्रमांकावर येऊन तीन सुवर्णपदके व प्रमाणपत्र प्राप्त केली. त्रिवेंद्रम येथे मी 2022 मध्ये संपन्न होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स जलतरण स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. नागपूरचे जलतरणपटू आणि नागरिक यांच्याकडून आनंद व्यक्त करत साठे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.