Home नागपूर ईव्हीएम हटाव देश बचाव धरणे निर्देशन करून विरोध;

ईव्हीएम हटाव देश बचाव धरणे निर्देशन करून विरोध;

17 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

बहुजन समाज पार्टी दक्षिण पश्चिम विधानसभा व दक्षिण विधानसभा च्यावतीने ईव्हीएम हटाव देश बचाव या राष्ट्रव्यापी आंदोलनाला
सुरुवात करण्यात आली आहे या धरणे प्रदर्शनाच्या विरोध कार्यक्रमांमध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव, बॅलेट पेपरने निवडणूक करा, निवडणूक आयोग मुर्दाबाद, मोदी सरकार मुर्दाबाद बहुजन समाज पार्टी जिंदाबाद अशा प्रकारचे नारे देऊन जनजागृती करण्यात आली. निवडणूक आयोग यांनी भारतीय   सविधानाची हत्या केली आहे .निवडणूक आयोग हा फक्त भारतीय जनता पार्टीच्या ध्येय धोरण अनुसार चालतो आहे. पाश्चिमात्य देशांमध्ये ईव्हीएम च्या विरोधात बंड झाले होते, आणि त्यांनी त्यांच्या संसदे मध्ये ठराव पारित करून ईव्हीएम मशीन ला त्या ठिकाणी बंद केले. भारताच्या कोर्टाने सुद्धा EVM मध्ये गडबड होते हे त्यांनी मान्य केले आहे. तरीसुद्धा निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर संपूर्ण भारत देशामध्ये ईव्हीएम ने निवडणूक कार्यक्रम घोषित करतो आहे. ईव्हीएम वर लोकांचा विश्वास उडाला आहे. ज्यावेळेस लोकशाहीमध्ये प्रजेचा विश्वास ज्या वस्तू गोष्टी वर बसत नाही , ती वस्तू  आणि ती गोष्ट प्रजेसाठी घातक असते.
 आणि म्हणून जबरदस्ती लादलेल्या या ईव्हीएम मशीन वर शासनाच्या दडपशाहीच्या माध्यमातून लोकांच्या माथ्यावर ईव्हीएम थोपवली जात आहे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, शोषित, पीडितांना, त्यांच्या हक्क न्याय साठी एका मताचा अधिकार मोठ्या संघर्षाने संविधानामध्ये तरतूद करून दिला त्याच मताच्या अधिकार, स्वतंत्ररीत्या देण्यास आधीपासून विरोध करणाऱ्या मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांनी आता ईव्हीएम मशीन च्या माध्यमातून गुलाम करण्याच्या त्यांच्या षड्यंत्र सुरू झाला आहे .आणि ते संपूर्णपणे यशस्वी होण्याच्या मार्गावर चालले आहे. त्यामुळें संविधान बदलण्याची त्यांची योजना  पुनर्वास येण्यासाठी त्यांनी देशाच्या दोन राष्ट्रीय पार्टी म्हणजेच बहुजन समाज पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षाला ईव्हीएम मध्ये गडबड करून कमी करण्याचे काम या भारत देशात केले आहे. त्यामुळे त्यांचे पूर्णा योजना यशस्वी होण्यासाठी कोणतेही सदस्य परिपूर्ण पणे लोकसभेत व राज्यसभेत राहतील नाही आणि त्यांना त्यांचे मनुवादी अधिकार आपल्या मताने बनवता येईल त्यासाठी ईव्हीएम चे हत्यार घेऊन बहुजनांच्या हक्क अधिकारवर अतिक्रमण करण्याचे काम त्यांनी सुरू केले आहे. यांच्या शेडयंत्राला हाणून पाडण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी व विचारधारेच्या लोकांनी एकत्र येऊन हा लढा रस्त्यावर घेऊन आंदोलन करण्याची फार गरज आहे. आणि म्हणून नागपूर
दक्षिण पश्चिम व दक्षिण विधानसभा नागपूर  स्थानिक पातळीवर या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हे जनजागृती कार्यक्रम संपूर्ण सेक्टर मध्ये करण्यात येणार आहे. आणि याची सुरुवात संपूर्ण  विधानसभेमध्ये सुद्धा करण्यात येईल हे निश्चित. या धरणे आंदोलन कार्यक्रमांमध्ये जिल्हा प्रभारी नागपूर  सौ वर्षाताई वाघमारे, नागपूर जिल्हा अध्यक्ष सुरेखाताई डोंगरे (महिला आघाडी) चंद्रशेखर कांबळे जिल्हा प्रभारी, अभिलेख वहाणे जिल्हा सचिव. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या आयोजकांन मध्ये दक्षिण-पश्चिम चे अध्यक्ष युवा ओपुल तामगाडगे दक्षिण विधानसभा अध्यक्ष युवा सुरज येवले,  दक्षिणचे महासचिव युवा विकास नारायने, दक्षिण चे कोषाध्यक्ष  युवा सचिन कुंभारे, बाळू भाऊ मेश्राम दक्षिण-पश्चिम उपाध्यक्ष, युवा विशाल बनसोड महासचिव. हर्षवर्धन जीबे कोषाध्यक्ष दक्षिण पश्चिम. पश्चिम नागपूर अध्यक्ष युवा मनोज निकाळजे, मध्य नागपूर अध्यक्ष युवा प्रवीण पाटील, सुंदरजी भलावी नरेंद्र नगर सेक्टर अध्यक्ष,संदीप बाबू इंगळे, सौ बबीता डोंगरवार, गौतम लोखंडे, रामबाग सेक्टर अध्यक्ष पंकज नाखले, सुरेंद्र डोंगरे इत्यादी कार्यकर्ता व समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाला यशस्वी केले.