Home सामाजिक उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मिरगणे यांचा न.पा. शिक्षण मंडळ ,बार्शी च्या वतीने सन्मान;

उपशिक्षणाधिकारी रावसाहेब मिरगणे यांचा न.पा. शिक्षण मंडळ ,बार्शी च्या वतीने सन्मान;

28 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शी यांचे विद्यमाने जि. प.उस्मानाबाद येथे उपशिक्षणाधिकारी माध्य.पदी नियुक्त झालेले
श्री. रावसाहेब मिरगणे यांचा सत्कार सन्मान सोहळा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ कॅम्पस मध्ये कर्मवीर मामासाहेब जगदाळे स्मृती संग्रहालय हॉल मध्ये उत्साहात पार पडलाकार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी श्री.सुनील गायकवाड(ग.शि. भूम) तर प्रमुख सत्कार मूर्ती म्हणून श्री.रावसाहेब मिरगणे साहेब प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.राजकुमार पाटील (ग.शि.करमाळा),श्रीम.सारिका गटकुळ (पोलीस उपनिरीक्षक, शहर बार्शी),श्री.मिलिंद मोरे,श्री.जयराम शिंदे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी,श्री.महेश पवार(प्र.अ.पंढरपूर/ कुर्डूवाडी),श्री.शाहू सत्पाल (प्र.अ.मंगळवेढा/अक्कलकोट),श्री.अनिल बनसोडे (प्र.अ.बार्शी), श्री.संजय पाटील (पर्यवेक्षक न.पा. बार्शी) उपस्थित होतेमान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय पाटील यांनी केले सत्कारमूर्ती रावसाहेब मिरगणे साहेबांचा एकंदरीत सेवेतील कार्याचा उंचावता आलेख आपल्या शब्दातून मांडला एक कर्मनिष्ठ प्राध्यापक ते कर्तव्यदक्ष प्रशासनाधिकारी व उपशिक्षणाधिकारी असा त्यांचा एकूण सेवेचा प्रवास सांगितला. कार्यतत्पर व अभ्यासू व्यक्तिमत्वाचा कार्यगौरव व सन्मान करणे हे या कार्यक्रमाचे प्रयोजन करण्यामागचा हेतू असल्याचे प्रशासनाधिकारी श्री.अनिल बनसोडे यांनी नमूद केले न.पा. शिक्षण मंडळ बार्शी च्या वतीने व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा सन्मान तसेच उपशिक्षणाधिकारी माध्य. पदी वर्णी लागल्याबद्दल  सत्कारमूर्ती श्री.रावसाहेब मिरगणे साहेबांचा सत्कार सन्मान शाल, श्रीफळ, हार, बुके देऊन अनिल बनसोडे व संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला तसेच बार्शीचे प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे यांना युथ आयकॉन पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मिलिंद मोरे, सारिका गटकुळ, जयराम शिंदे, महेश पवार, शाहू सत्पाल यांनी मनोगते व्यक्त केली.
आपल्या तालुक्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व योग्य मार्गदर्शक, कुशल प्रशासक उपक्रमशील प्रशासनाधिकारी म्हणून ओळखले जाणारे रावसाहेब मिरगणे यांच्या कार्याबद्दल गौरव उद्गार अनिल बनसोडे यांनी आपल्या मनोगतात काढले सत्काराला उत्तर देताना रावसाहेब मिरगणे यांनी सन 1995 ते 1999 या काळात बार्शीतील सर्व शिक्षकांना सोबत घेऊन राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा उल्लेख केला. त्यानंतर सर्वच प्रशासन अधिकारी यांनी विवीध उपक्रम चालू ठेवले. सर्व शिक्षकांनी आपल्या शाळा स्वयंअर्थसहित शाळांसोबतच्या स्पर्धेत टिकतील यासाठी परीश्रम घ्यावेत असे उदगार मिरगणे साहेबांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले अध्यक्षीय भाषणाने व सर्वांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.