Home Breaking News कृषी विद्यापीठाची इमारत जीर्ण झालेली इमारत नव्याने करण्याकरीता शासनाने निधी मंजूर करावा...

कृषी विद्यापीठाची इमारत जीर्ण झालेली इमारत नव्याने करण्याकरीता शासनाने निधी मंजूर करावा -मुंकद पालटकर.

21 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर: ( दि. १५ मार्च 22 )
कृषी विद्यापीठाची जीर्ण झालेली इमारत नव्याने करण्याकरीता शासनाने निधी मंजूर करावा –
मुंकद पालटकर
महाराष्ट्र राज्य कृषी विभाग महासंघ समन्वय महासंघा च्यावतीने नागपूर येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, कृषी महाविद्यालय नागपुर ची जीर्ण इमारत ऐवजी नवीन इमारत बांधण्यास निधी मिळण्यात यावा याकरिता महामहीम राज्यपाल (महाराष्ट्र राज्य) मुख्यमंत्री, वित्तमंत्री, कृषीमंत्री, कृषी राज्यमंत्री, प्रधान सचिव (कृषी) या सर्वांना निवेदन देण्यात आले.
   महाराष्ट्र राज्य कृषी विभागाच्या वतीने राज्य सरकारला निवेदन दिले कि, नागपुरातील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जीर्ण इमारत झालेली आहे. ती मागील 166 वर्ष जुनी इमारत आहे. इमारतीचे बांधकाम नवीन करायचे आहे. त्याकरिता राज्य शासनाकडून निधी मिळण्यात यावा. अशी मागणी केली आहे. परंतु 1856 मध्ये निर्माण झालेल्या या 166 वर्षात जुन्या व जीर्ण झालेल्या इमारतीतच अजूनही कृषी महाविद्यालय सुरू आहे. येथे बीएससी कृषी व एमएससी कृषि हे अभ्यासक्रम सुरू आहे. या इमारतीत कार्यालय प्रयोगशाळा वर्ग कक्ष तसेच इतर विभागही आहेत या महाविद्यालयात आज विद्यार्थ्यांची संख्या बाराशेच्यावर असून कर्मचारी, प्राध्यापक व इतर संस्था गृहीत धरल्यास हा आकडा जवळजवळ तीनशे पर्यंत आहे. राणी महाल या नावाने प्रख्यात ही इमारत हेरिटेज दर्जाची आहे. या इमारतीचे नूतनीकरण यथाशिग्र आवश्यक आहे. कारण अशाच प्रकारे पुणे येथे कृषी महाविद्यालयाची इमारततिचे नूतनीकरण यासाठी महाराष्ट्र शासनाने शंभर कोटीचे अनुदान देवून पुन्हा पुननिर्माण केले. परंतु नागपूर कृषी महाविद्यालय इमारतींच्या अनुदाना बाबत अजूनही निर्णय घेतलेला नाही. यांकरिता निवेदन दिले. कृषी महाविद्यालय ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची मुले, मुली शिक्षण घेत असतात. तसेच हजारो कृषी स्थातकोत्तर व पीएचडी विद्यार्थी 116 वर्षात तयार झाले आहेत. या इमारतीची अधिक दुरावस्था झाली असून इमारतीचे छत, टॉवर, फरशांचे छत, मनोरा, लोखंडी बार, कवेलू, प्लास्टर त्याचप्रमाणे भिंतीला पडलेल्या भेगा व सज्जे अधिक धोकादायक आहेत. कधीही धोका होऊ शकतो राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावे. अशी मागणी केली आहे. इमारतीत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग जीव मुठीत घेऊन काम करीत असतात. त्यामुळे कोणत्याही क्षणी दुर्घटना घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य सरकारला नम्र विनंती आहे की, कृषी महाविद्यालयाची जीर्ण इमारतीचे नूतनीकरण तात्काळ करण्यात यावा. इमारतीच्या नूतनीकरणासाठी आवश्यक अनुदान मंजूर करण्यात यावा. जेणेकरून पुढील अघटित घटना टाळता येऊ शकेल जनहिताच्या दृष्टीने सकारात्मक विचार व्हावा व शासनास याबाबत शिफारस व्हावी. अशी विनंती या संघटनेने केली आहे. अधिक माहिती करिता मुकुंद पालटकर यांच्याशी संपर्क साधू शकता. सरचिटणीस मुकुंद पालटकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकात माहीती दिली आहे.