Home नागपूर विखुरलेला सोनार समाज एकत्रित करण्याची गरज- अनिता द्वारव्हेकर;

विखुरलेला सोनार समाज एकत्रित करण्याची गरज- अनिता द्वारव्हेकर;

25 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

जागतिक महिला दिनानिमित्त ऑल इंडिया सोनार फेडरेशन, महिला विकास मंच नागपुर विभागातर्फे सौ.अनिता शेषराव दारव्हेकर, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश यांनी “सन्मान स्त्रि शक्तिचा” महिला महोत्सव व गौरव पुरस्कार सोहळा बुधवारी वैश्य सोनार भवनात संपन्न झाला. सौ.चित्राताई वाघ, प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य (भाजपा) व ऑ.इं.सो.फे.प्रदेश अध्यक्ष यांनी कार्यक्रमाचे उदघाटन केले. कार्यक्रमाच्या मुख्य अतिथि सौ. कांचनताई गडकरी, जेष्ठ समाजसेविका आणि श्रीमती कीर्तिताई चिंतामणी, कारागृह अधिक्षक, यवतमाळ होत्या. या कार्यक्रमाला वसुधा मस्के, सौ.इंद्रायणी सुरेश काळबांडे, सौ.मनिषा अनासाने आणि सौ.मायाताई लकडे प्रमुख अतिथि होत्या. कार्यक्रमाचे विशेष आकर्षण इंडियन ऑयडल फेम कैवल्य केजकर उपस्थित होते. तसेच राहुल आसरे द्वारा, मोती वितरण करण्यात आले आणि आकाश किशोर काटोले तर्फे सौ.जयश्री भजभुजे यांना सायकल भेट दिली. या कार्यक्रमाचे मुख्य उद्दीष्ट विखुरलेला सोनार समाज एकत्रित करणे आणि विविध क्षेत्रात उत्कृष्ट व सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांचा सन्माचिन्ह देऊन गौरव करने हा होता. कार्यक्रमाचे संचालन सौ.मनीषा वाकोडे यांनी केले. कार्यक्रमाला डॉ.सौ.स्वप्निली कारमोरे, सौ. रीताताई रोकडे, सौ.शालिनीताई काटोले, सौ नीताताई पोतद्दार, सौ. सुचिताताई रोकडे आणि इतर भगिनी उपस्थित होत्या. तसेच ऑल.इं.सो.फे.चे राष्ट्रीय अध्यक्ष मोहनशेट हिवरकर, विलासराव अनासाने, प्रकाश माथने, डॉ.प्रविण कारमोरे आणि बराच सोनार परिवार उपस्थित होता.