Home नागपूर महिला सप्ताह निमित्त आम आदमी पार्टीने राजकीय वर्तुळात काम करणाऱ्या महिलांचा केला...

महिला सप्ताह निमित्त आम आदमी पार्टीने राजकीय वर्तुळात काम करणाऱ्या महिलांचा केला सत्कार;

23 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

रविवार दि.13/03/22 रोजी आम आदमी पार्टी,दक्षिण नागपूर प्रभाग 49 तर्फे महिला दिन व पंजाब मध्ये झालेंला अभूतपूर्व विजय साजरा करण्याकरिता श्री निखिल जी मेंढवाडे यांच्याकडे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री जगजितजी सिंग कोषाध्यक्ष महाराष्ट्र राज्य व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ शाहिद अली जाफरी जी संयोजक हेल्थ विंग विदर्भ,श्री भूषणजी ढाकुलकर सचिव नागपूर जिल्हा,श्री मनोजजी डफरे संयोजक दक्षिण नागपूर,सौ करुणा चहांदे,सौ वैशाली पाटील,श्री प्रदिप कोल्हे, श्री गुलाबराव मेंढवाडे, श्री शरद कपटे उपस्थित होते.

यावेळी महिला पत्रकार डॉ अर्चना मनोज व निशा पंजवणी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ अर्चना मनोज ह्या २०१३ पासन वैद्यकिय क्षेत्रात सल्लागार आणि जन सपर्क अधिकारी म्हणून  कार्यरत आहेत. २०२० मध्ये त्या कृषी समृद्धी चॅनल ला कार्यकारी संपादक तसेच मा प्रोडक्शन मिडीया ला २०१८ पासून कार्यरत आहेत. निशा पंजवानी या मागील आठ वर्षापासून पत्रकारिता करीत आहेत निशा पंजवानी ह्यावेळी महिलांचे व युवानचे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवत असतात त्यांच्या पत्रकारिता जीवन मध्ये त्यांनी महिलांवर अत्याचार झालेल्या मुद्द्यांना प्रखर प्रकारे लोकांपर्यंत पोहोचवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ मेघा वाकोडे व संचालन व आभार प्रदर्शन श्री सचिन पारधी यांनी केले.कार्यक्रमाचे आयोजन श्री निखिल जी मेंढवाडे यांनी केले.कार्यक्रमाला आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते प्रामुख्याने श्री उमाकांत बनसोड, सौ चैताली बनसोड,श्री प्रशांत खडतकर,डॉ प्रज्ञा खरे,श्री प्रणित कडू,श्री शुभम पराळे,श्री अभय रामटेककर,श्री मनोहर नागदिवे,श्री मोहम्मद इलियास,श्री अब्दुल हाफीज, श्री शेख रफिक,श्री राजू देशमुख,श्री संजय अनासाने, श्री राजूरकर, श्री चंद्रशेखर पराड,श्री विशाल मानकर व वस्तीतील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.