Home नागपूर नंदनवन मध्ये डॉ. राजेश दवे व वस्तीतील नागरिकांचा आम आदमी पार्टीत पक्ष...

नंदनवन मध्ये डॉ. राजेश दवे व वस्तीतील नागरिकांचा आम आदमी पार्टीत पक्ष प्रवेश;

18 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

राष्ट्रनिर्माण तसेच पक्ष संघटन विस्तार कार्यक्रम अंतर्गत पक्षाचे ध्येय धोरण आत्मसात करून राष्ट्रीय संयोजक श्री. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श ठेऊन अनेक युवा नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला. आम आदमी पार्टीच्या कामाला प्रेरित होऊन 30-35 पेक्ष्या अधिक संख्येने नवीन सदस्याचा पक्ष प्रवेश करून येत्या मनपा निवडणुकीत आपचा दणदणीत विजयी करून भ्रष्टाचार मुक्त व प्रामाणिक व्यवस्था निर्माण करण्याचा संकल्प घेऊन “आपचा महापौर 2022” अभियान राबविण्यात आले.

नागपूर शहर विधानसभा क्षेत्र पूर्व नागपूर,  प्रभाग 30 चे डॉ. राजेश दवे सह अनेक कार्यकर्त्यांचा सोमवार दिनांक १४/०३/२०२२ ला नंदनवन कॉलनी येथे महाराष्ट्रचे कोषाध्यक्ष श्री जगजीत सिंह व पूर्व नागपूर विधानसभा अध्यक्ष श्री. नामदेव कामडी यांच्या नेतृत्वाखाली तसेच पक्षाचे उच्चपदस्थ प्रमुखांच्या उपस्थिती मध्ये पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाला प्रामुख्याने शहर सचिव भूषण ढाकुलकर, शहर उपाध्यक्ष राकेश उराडे, पूर्व विधानसभा सचिव धिरज आगाशे, विधानसभा कोषाध्यक्ष सोनू फटिंग, विधानसभा युवा अध्यक्ष हेमंत पांडे, युवा सचिव प्रतीक बावनकर, आंबिद भाई, जिनेश शाह, बबलू मोहाडीकर, प्रकाश जवादे, मोहन मांगर, कुणाल मंचालवर, अभय भोयर, अशोक मोइजे, मयंक यादव, खान जी इत्यादी उपस्थित होते.

आम आदमी पार्टी पक्ष सोहळ्यात प्रवेश घेणारे डॉ. शाबीना खान, शुभांगी दवे, शिरीन शेख, सीमा अहमद, शकील अहमद, मीराबेन दवे, शेख जायदा, हमीदा खान, मुस्तफा अहमद, मोहमद मुसफर, आफताब खान, यश दवे, सोनल विरमान, योगेश सोलंका, रूपेंद्र सिंग नागपुरे, लक्ष्मण नागपुरे, रवींद्र तिवारी, नितीन पांडे, लक्ष्मण द्विवेदी व इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.