Home नागपूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राकेश नंदनवार यांची नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राकेश नंदनवार यांची नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड.

28 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी नागपूर जिल्हा ग्रामीण उद्योग व व्यापारी सेलचे जिल्हाध्यक्ष राकेश नंदनवार असून राजकुमार वानखेडे नाहीत असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापारी आघाडीमध्ये जिल्हाध्यक्षपदाचा वाद सुरू आहे.
राजकुमार वानखेडे हे दि.23 -1- 2021 पर्यंत कार्यरत होते. त्यानंतर नवनियुक्त उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेशजी फाटे यांनी राकेश गणपतराव नंदनवार यांची राष्ट्रवादी उद्योग-व्यापार सेलच्या नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निवड केली. असे पत्र त्यांनी दिनांक 23- 9 – 2021 ला नागपूर येथील पक्ष कार्यालयात जाहीर केले असून राजकुमार वानखेडे हे आजही स्वतःला या सेलचे जिल्हाध्यक्ष म्हणून संभवतात व उद्योग व व्यापार विभागाच्यावतीने कार्यक्रम घेतात. परंतु यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. प्रदेशाच्या वरिष्ठ नेत्यांनी राजकुमार वानखेडे यांना सूचित केले आहे तरीसुद्धा पक्षाची अवहेलना करत आहे . जिल्ह्यातील राजकुमार वानखेडे यांनी केलेल्या नियुक्त्या अवैद्य समजण्यात आल्या. पक्ष आदेशाची अवहेलना केल्यास पक्षातर्फे कारवाई करण्यात येईल असेही म्हटले आहे.
**********
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्यावतीने उद्योग व व्यापार विभागाच्या नागपूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी राकेश नंदनवार यांची नियुक्ती केली आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाचे ध्येय धोरणे राष्ट्रीय अध्यक्ष व मा. खासदार  शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, जलसंपदामंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील व खासदार सुप्रिया सुळे यांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोचविण्यासाठी माझे सहकार्य लाभेल तसेच माझ्यावर दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडेल असा मला विश्वास आहे.