Home सामाजिक दत्त प्राथमिक विद्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे जागतिक महिला दिन...

दत्त प्राथमिक विद्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे जागतिक महिला दिन साजरा;

18 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

दत्त प्राथ.विद्यामंदिर व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथे दि:-०८/०३/२०२२ रोजी जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई (ठोंगे)संस्थेच्या सचिवा सौ.तेजस्वी ताई मोहन ठोंगे तर प्रमुख पाहुणे म्हणून बँक ऑफ बडोदा शाखा बार्शी येथे कार्यरत असलेल्या अग्रीकल्चर ऑफिसर व दत्त शाळेच्या माजी विद्यार्थिनी हेमाताई दुधाळ
तसेच आरोग्य परिचारिका सातपुते एस. पी.व सिरसट एम.ए.शाळेतील शिक्षिका श्रीम. संगीता काळे मॅडम,अरुणा मठपती मॅडम,श्रीम.विलंबिनी पाटील मॅडम उपस्थित होत्या प्रमुख उपस्थिती म्हणून सादिक बागवान सर,चंद्रकांत लोखंडे सर हे दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक व छत्रपती क्रीडा, शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई (ठोंगे)संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन (आण्णा) ठोंगे उपस्थित होते मान्यवरांचे     शाब्दिक स्वागत तसेच कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री.युवराज जगताप सरांनी केले  कार्यक्रमाच्या  सुरुवातीस अध्यक्षा,प्रमुख पाहुण्या व उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले .
              प्रतिमा पूजनानंतर पाहुणे व अध्यक्षा यांचा परिचय जगताप सरांनी करून दिला शाळेतील ज्येष्ठ शिक्षिका श्रीम.संगीता काळे मॅडम यांचे हस्ते दत्त प्राथमिक शाळेच्या वतीने अध्यक्षांचा सत्कार व सन्मान करण्यात आला अध्यक्षांच्या हस्ते हेमा ताई दुधाळ, सातपुते सिस्टर,सिरसट सिस्टर तसेच संगीता काळे मॅडम,अरुणा मठपती मॅडम,विलंबिनी पाटील मॅडम यांचा शाल श्रीफळ व गुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.छत्रपती क्रीडा शिक्षण व समाजसेवी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष मोहन आण्णा ठोंगे सरांच्या हस्ते अध्यक्षा, प्रमुख पाहुण्या व शाळेतील महिला शिक्षिका यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे नेटके नियोजन व सुंदर सुत्रसंचलन केल्याबद्दल ठोंगे सरांच्या हस्ते जगताप सर व मोरे सर यांचा सन्मान करण्यात आला.
               इयत्ता 8 वी ते 10 वी मधील 10 मुलींनी आपली मनोगते व्यक्त केली. शिक्षक प्रतिनिधी म्हणून विलंबिनी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले आरोग्य सेविका सातपुते यांनी आरोग्याच्या संदर्भाने मनोगत व्यक्त केले प्रमुख पाहुण्या हेमाताई दुधाळ यांनी आपल्या मनोगतातून या शाळेतून दिले जाणारे संस्कार किती महत्वाचे आहेत हे सांगितले आयुष्यात पुढे जायचे असेल तर गुरुजनांचा आदर राखा आई व वडील हे दैवत आहे त्यांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी अथक परिश्रम करा हा संदेश दिला अध्यक्षाच्या वतीने श्री.युवराज जगताप सरांनी मनोगत व्यक्त केले स्त्रीत्वाचा
सन्मान करणे का गरजेचे आहे हे विषद केले.
स्त्रियांच्या हक्कांची पूर्वी कशी पायमल्ली केली स्त्रीला दुय्यम स्थान दिले गेले व त्या अन्यायास वाचा फोडण्यासाठी राजाराम मोहन रॉय,धोंडो केशव कर्वे,महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,रमाबाई रानडे,पंडित ईश्वरचंद्र विध्यासागर यांनी केलेले प्रयत्न विसरून चालणार नाही.
स्त्रीचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे असे मत मांडले  स्त्री- एक शिल्पकार ही स्वरचित कविता कवी युवराज जगताप यांनी सादर केली.
येण्या जन्मास नारी तू
गर्भातही  बंड केलं
जन्मण्याच्या गं आधीच
युद्ध तुझं सुरू झालं
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी चंद्रकांत लोखंडे, सादिक बागवान,संगीता काळे, अरुणा मठपती,श्रीकांत कुंभारे,युवराज जगताप,राहुल ठोंगे ,सचिन काळे ,संतोष ठोंबरे , विलंबिनी पवार,सेवक- श्री.संदीप भोरे  परिश्रम घेतले मंगेश मोरे सरांनी सर्वांचे आभार मानले व  सूत्रसंचालन कवी युवराज जगताप सरांनी केले व आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला.