Home सामाजिक महिला दिनी अरुणा मठपती यांचा सन्मान;

महिला दिनी अरुणा मठपती यांचा सन्मान;

32 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नगरपालिका शिक्षण मंडळ बार्शीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिन यशवंतराव चव्हाण सभागृह येथे उत्साहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बार्शी न.पा. च्या मुख्याधिकारी तथा प्रशासक मा.अमिता दगडे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्शी न.पा. च्या वर्ग -१ लेखाधिकारी मा.मिनाक्षी वाकडे , स्टेट बँक ऑफ इंडिया सुभाषनगर शाखाधिकारी मा. अनुराधा जगदाळे तसेच ज्यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम संपन्न झाला असे शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी मा.श्री.अनिल बनसोडे , पर्यवेक्षक मा.श्री.संजय पाटील उपस्थित होते .                   आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त दत्त प्राथमिक विद्यामंदिर बार्शी येथे कार्यरत असलेल्या उपक्रमशील शिक्षिका अरुणा मठपती यांचा  शैक्षणिक,सामाजिक , सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल शाल, सन्मानचिन्ह , प्रमाणपत्र , गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला
या सन्मानाबद्दल छत्रपती क्रीडा,शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई (ठोंगे)संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहन (आण्णा) ठोंगे,मुख्या ध्यापक सादिक बागवान व सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या