Home नागपूर दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालाद्वारे जागतिक महिला दिवस साजरा;

दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालाद्वारे जागतिक महिला दिवस साजरा;

23 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

दि. ८ मार्च २०२२ रोजी दादासाहेब बालपांडे कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयातील महिला विकास कक्ष व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. त्या निमित्य महाविद्यालया द्वारे पुढील कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
१) मी आणि माझे स्वास्थ्य मोहीम
२) स्वरक्षण पथनाट्य
३) विविध क्रीडा स्पर्धा
मी आणि माझे स्वास्थ्य ह्या कार्यक्रमाअंतर्गत महाविद्यालयातील महिला शिक्षिका व विध्यार्थिनीनी महिला स्वास्थ्य जनजागृती रॅली काढून महाविद्यालयाजवळील शंकरपूर ग्रामपंचायत, वेळाहरी ग्रामपंचायत, गोटाळपांजरी, बेलतरोडी ग्रामपंचायत, महाकाली नगर येथील गरजू महिला व मुलींकरिता 250 सेनेटरी पॅड कीटचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांना मासिक पाळीच्या वेळी महिलांचे स्वास्थ्य आणि स्वच्छता बद्दल माहिती देण्यात आली. तसेच वरील गावातील महिलांकरिता महाविद्यालयातील विद्यार्थीनी द्वारे महिला संरक्षण पथनाट्य सादर करण्यात आले. सदर कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनीकरिता महाविद्यालयाच्या परिसरातील विविध क्रीडास्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उज्वला महाजन, प्रा. डॉ. विद्या साबळे, सौ. रुची शिवहरे, सौ. विजयश्री रोकडे, सौ. मोनाली दुमोरे, सौ.संध्या बागडे, डॉ. देवेश्री नांदुरकर, कु. अश्विनी इंगोले, कु.रोहिणी खरवडे, कु. विजया रबडे, कु.अमृता शेटे, कु. श्वेता काळे, कु.रुशिका जैस्वाल, कु.गायत्री तिवस्कर, कु.कृतिका सावरकर व महाविद्यालयातील विद्यार्थिनींचा महत्वपूर्ण परिश्रम घेऊन सहभाग लाभला.