विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
नागपूर: दि.९ मार्च
महाल भाजी मंडी ढिवरवाडा येथे ढिवर समाज महिला बहुउद्देशीय संस्थे च्यावतीने जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला. या वेळी समाजातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती अध्यक्ष सौ. वनिताताई नगरे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमांमध्ये महिलांना कसे रोजगार देता येईल व ज्यांना रोजगारापासून कसे उत्पन्न घेता येईल हे ठरविण्यात आले. शिलाई मशीन घेऊन रोजगार देण्याचे आश्वासन दिले. तसेच शिक्षण महर्षी सावित्री बाई फुले यांच्या फोटोला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या अध्यक्षा वनिता नगरे, भारती नान्हे, रुपा दिघोरे, दुर्गा शिवरकर, रश्मी नान्हे, सुनंदा उके, रेखा चाचेरकर, शिला नान्हे, महानंदा शिवरकर, विजयाताई करनुके, नंदाबाई शिवरकर, मालु चाचेरकर, कमला पालादुरकर, रोडे, भारती डायरे, पुष्पा मोहनकर यावेळी उपस्थित होत्या. यावेळी समाजातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

