Home नागपूर घरकाम करणाऱ्या महिलांना मोलकरीण नको घरकामगार म्हणा -रूपा कुलकर्णी;

घरकाम करणाऱ्या महिलांना मोलकरीण नको घरकामगार म्हणा -रूपा कुलकर्णी;

42 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

घरकाम करणाऱ्या महिलांना मोलकरीण नको घरकामगार म्हणा -रूपा कुलकर्णी
घरगुती काम करणाऱ्या महिला मदतनीसांना मोलकरीण, बाई असे न संबोधता तिला घरकामगाराचा दर्जा द्यावा, त्यातून तिच्या श्रमांचे मोल होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रुपा कुळकर्णी यांनी केले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ, पत्रकार भवन ट्रस्ट आणि पत्रकार क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, सहपोलिस आयुक्त अश्वती दोरजे, डॉ. रुपा कुळकर्णी, ज्येष्ठ पत्रकार एस.एन.विनोद, पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर, क्लबचे अध्यक्ष प्रदीप मैत्र व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना डॉ.रुपा कुळकर्णी यांनी, १९७५ पासून मी ही चळवळ सुरू केली आणि आमचा संघर्ष तसेच पत्रकारांची मदत यामुळे शासनाला कायदा करणे भाग पडले व आज घरकामगारांना काही प्रमाणात का होईना सन्मान प्राप्त झाल्याचे सांगितले. याप्रसंगी प्राजक्ता लवंगारे यांनी शासकीय प्रक्रियेत राहून देखील संवेदनशीलता कायम असेल तर समाजाला न्याय देणे शक्य असल्याचे सांगितले. अश्वती दोरजे यांनी, समाजात महिलांसोबत होत असलेल्या गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी लहान मुले आणि मुलांसाठी जागृती अभियान तसेच पोलिस दीदी हा उपक्रम सुरू करण्यात येत असल्याचे सांगितले.
आजच्या महिला दिन कार्यक्रमात डॉ.रुपा कुळकर्णी यांना स्त्री गौरव पुरस्कार तसेच वुमेन जर्नालिस्ट आॅफ द इयर, हा लोकशाही न्यूज चॅनेलच्या कल्पना नळसकर यांना श्रीमती शोभा विनोद यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासोबतच रचना दटके (हितवाद), अंकिता देशकर (लोकमत टाईम्स), रेवती जोशी-अंधारे (तरुण भारत) यांना पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबाबत सन्मानित करण्यात आले. तसेच कामकाजी महिला गटात मेधावी पराग जोशी यांना शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक प्रदीप मैत्र यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन वर्षा बाशू व वर्षा मदने यांनी केले. आभारप्रदर्शन शिरीष बोरकर यांनी केले.
Attachments area