Home मुंबई सीटू च्या आशा वर्करांचा महिला दिन साजरा.. I

सीटू च्या आशा वर्करांचा महिला दिन साजरा.. I

22 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

सीटू च्या प्रयत्नाने आशा वर्कर यांचा महिला दिन  दि. 8 मार्च 2022 रोजी आरोग्य भवन, मुंबई येथे अतांत्रिक (सहसंचालक) मा.संजय सरवदेसो (NHM) व आशा योजना राज्य कार्यक्रम व्यवस्थापक मा.अनिल नक्षणे यांच्या सोबत महाराष्ट्र आशा व गटप्रवर्तक फेडरेशन (CITU)चे पदाधिकारी व सदस्य यांच्यासोबत तातडीच्या प्रश्नाबद्दल शिष्टमंडळ भेटले व चर्चा करण्यात आली.
चर्चेतील मुद्दे पुढीलप्रमाणे :.
1) आशा व गटप्रवर्तक यांचे राज्य सरकार कडील 2000 व 3000 वाढ, 1500 व 1700 ची वाढ यासाठी ची *180कोटीची तरतुद* करून हा फंड आरोग्य विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे,हे आशा व गकप्रवर्तक यांच्या खात्यावर मार्च 2022 अखेर वर्ग होतील
2) आशा व गटप्रवरतक यांच्या मानधनामद्ये कपात करण्यात येऊ नये याबाबत ही चर्चा करण्यात आली.
2) आरोग्यवर्धिनीचे थकीत मानधन मार्च अखेर वर्ग होणार.
3) कोवीड 19 चे केंद्र शासनाचे 1000 व 500रु मार्च अखेर खात्यावर वर्ग होणार.
4) आशा व गटप्रवर्तक यांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपर्यंत राज्य शासन प्रयत्नशील राहील.
5) अर्बन भागात आशा व गटप्रवर्तक यांची लवकरच पदभरती करण्याचा मंजुरीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
6) गटप्रवर्तकांची पदभरती आशांमधुन होणार.
7) आशा व गटप्रवरतक यांना वेतनचिठ्ठी मिळणार.
8) आशा व गटप्रवर्तक यांना व त्यांच्या कुटुंबाचे आजार व उपचार मिळावा यासाठी CSR फंडातून मिळण्यासाठी विषेश प्रयत्न केले जाणार.
9) आशा व गटप्रवर्तक यांना लागणारे सर्व स्टेशनरी व रजिस्टर छापील स्वरूपात राज्य स्तरावरून मिळणार.
10) संपकाळातील वेतन कपातीबाबत प्रोसिडीग मद्ये बघुन त्या बाबतच्या मानधनावर निर्णय घेतला जाईल.
11) गटप्रवर्ताकाचा साॅप्टवेअर भत्ता लवकरच पुर्ववत देण्यात येणार.
12) गटप्रवर्तक यांचा आरोग्यवर्धिनी मद्ये समावेश करण्याचा केंद्राकडे पाठपुरावा करणार
13) प्रत्येक नविन योजने चे आशा बरोबर गटप्रवर्तकांचेही प्रशिक्षण होणार
14) लवकरच गटप्रवर्तकांसाठी तालुक्याला 1कंप्युटर मिळणार
15) लवकरच आशा व गटप्रवर्तक यांना मेडिसीन, रजिस्टर व स्टेशनरी ठेवण्यासाठी कपाट देण्यासाठी शासन विचाराधीन आहे.
16) गटप्रवर्तकांना मध्यप्रदेश च्या धर्तीवर 30 दिवसाप्रमाणे वेतन मिळावे तसेच गटप्रवर्तकांचीही ट्रेनर म्हणून निवड करण्यात यावी या दोन्ही मागण्याबाबत प्रशासन  विचाराधीन आहे. इत्यादी सकारात्मक चर्चा व केंद्रस्तरीय मागण्या बाबत केंद्रशासनाकडे करण्यात येईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. या शिष्टमंडळात फेडरेशन च्यावतीने नेत्रदिपा पाटील (सहसचिव, राज्य आशा फेडरेशन व जिल्हध्यक्षा, कोल्हापुर जिल्हा आशा व गटप्रवर्तक युनियन) अर्चना घुघरे व मिनाक्षी गायकवाड, सुषमा गुरगुरे (वर्धा) प्रविण चौधरी (जळगाव) प्रिती मेश्राम व राजेंद्र साठे (नागपूर) उज्वला पाटील (फेडरेशन कौन्सिल सदस्य व जिल्हा सचिव) संगिता पाटील (खजिनदार) ज्योती तावरे (शहराध्यक्षा) सुरेय्या तेरदाळे यांनी चर्चेत सहभाग नोंदवला.