Home नागपूर श्री गुरुदेव सेवा मंडळ अंबिका नगर जागतीक महिला दिन साजरा ;

श्री गुरुदेव सेवा मंडळ अंबिका नगर जागतीक महिला दिन साजरा ;

23 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

श्री  गुरुदेव सेवा मंडळ अंबिका नगर, नागपुर शाखेच्या अंतर्गत नागपूर येथील अंबिका नगरात ८ मार्च रोजी, जागतीक महिला दिनाच्या निमित्याने शाखेच्या महिला मंडळाच्या वतीने संध्याकाळी महिलानचा सत्कार /महिला शक्तिन्ना प्रोसाहनस्व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.नींबूलकर ताई हया होत्या. सौ.नींबूलकरताई व महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. पुष्पाताई कोठे, सौ. मालतीताई अमृतकर व उपस्थित सर्व महिलांनी यावेळी आप, आपले विचार मांडले. सौ. कोठेताई, अमृतकरताई, मोकदमताई, सालोडकरताई, पोटदुखेताई, कुथेताई, सुनीताताई भंडारकर, मन्दाताई सटप हया होत्या तर श्री गुरुदेव सेवा मंडलाचे सचिव श्री दिलिप गाडगेदादा, प्रचार प्रमुख श्री दशरथजी कोठे, फटींगदादा, सुधाकर आगोले दादा, टेटेदादा, चौधरीदादा, नींबूलकर दादा हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ. मालतीताई अमृतकर यांनी केले तर सौ. पुष्पाताई कोठे यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगिताने करन्यात आली. कार्यक्रम सफलतेचे श्रेय दिलिप गाडगे व त्यांच्या मडंळाला जातो. असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.