Home सामाजिक आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते आमदार निधीतून ई-रिक्षा कचरा गाड्यांचे व राष्ट्रीय...

आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते आमदार निधीतून ई-रिक्षा कचरा गाड्यांचे व राष्ट्रीय कुटुंब योजना 20 हजाराचे धनादेश वाटप करण्यात आले.

30 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

दिनांक 25/02/2022 रोज शुक्रवार ला पंचायत समिती उमरेड येथे आमदार निधीतून आमदार राजूभाऊ पारवे यांचा हस्ते ई-रिक्षा कचरा गाड्यांचे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रीय कुटुंब योजना चे 20 हजाराचे धनादेश पण 20 निराधार महिलांना देण्यात आले.
ई-रिक्षा कचरा गाड्यां बेला 3, सिर्सी 3, मकरधोकडा 2, आपतूर 1, उदासा 1, नवेगाव साधू 1, पिपरा 1, एकूण 12 ग्रामपंचायत ला वाटप करण्यात आले.
गावातील घणकचरा चे व्यवस्थाप व्हावे व गाव स्वच्छ व्हावे हा एक उद्देश ठेवून उमरेड तालुक्यातील ग्रामपंचायती पासून सुरवात करण्यात आली.
तसेच निराधार महिलांना आर्थिक हातभार लागावे या करिता राष्ट्रीय कुटुंब योजना चे 20 हजाराचे धनादेश पण 20 निराधार महिलांना देण्यात आले.
 या वेळी जिल्हा परिषद सदस्य राजू सुटे, संजय निराधार योजनेचे अध्यक्ष जितेंद्र गिरडकर, पंचायत समिती सदस्य पुष्कर डांगरे, गट विकास अधिकारी माने, नायब तहसीलदार वरपे, संजय निराधार योजनेचे सदस्य शिवदास कुकडकर, माधुरी देशमुख, विलास कांबळे, यादव भोयर तसेच सरपंच व ग्रामसेवक व लाभार्थी उपस्थित होते.