विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
गेल्या १० वर्षापासून नागपूरातील राज्य ग्राहक आयोगाच्या बेंचचे प्रलंबित प्रकणचा निपटारा त्वरीत व्हावा तसेच याकरिता द्विसदस्यीय दोन बेंच सतत कार्यरत ठेवण्यात यावे व दरमहा २०० प्रकरणे निकाली काढण्याचे टार्गेट (लक्ष) देण्यात यावे अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत नागपूर महानगरच्या शिष्ट मंडळाच्या वतीने राज्य ग्राहक आयोगाचे अध्यक्ष डॉ.संतोष काकडे यांची नुकतीच निवेदनाद्वारे करण्यात आली. यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले. नागपूरला दोन जिल्हा ग्राहक आयोग आहेत तिसऱ्या मजलयावरील जिल्हा
ग्राहक आयोगाच्या अध्यक्षांना अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. त्यामुळे तिसऱ्या
मजल्यावरील जिल्हा ग्राहक आयोगाचे कामकाज आठवडयातून केवळ दोन दिवसच चालते व ५ व्या मजल्यावरील जिल्हा ग्राहक आयोगाचे कामकाज आठवडयातून तीन दिवस चालते यामुळे खूप मोठया प्रमाणात तक्रारी प्रलंबित असतांना नगण्य निपटारा होत आहे. अशा स्थितीत तिसऱ्या मजल्यावरील कायदेशीर पार्श्वभूमी असलेल्या दोन सदस्यांना स्वतंत्रपणे कामकाज करण्याची मुभा देण्यात यावी. जेणेकरुन दोन्ही जिल्हा ग्राहक आयोगाचे कामकाज अखंडित चालू राहील तसेच तयांना दरमहा २०० तक्रारी निकाली काढण्याचे टार्गेट सुध्दा देण्यात यावे. सदर कायदयातील तरतूदीच्या अनुषंगाने ग्राहकांना राज्य ग्राहक आयोगात सुध्दा स्वःता तक्रार मांडता यावी याकरीता मराठी मध्ये कामकाज करण्यात यावे. आपण दरमहा आठ दिवस नागपूरला येवून विदर्भातील ग्राहकांना न्यायदान करावे याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले. शिष्ट मंडळात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे नगर संघटक संजय धर्माधिकारी, जिल्हा महिला अध्यक्ष श्रीमती संध्या पुनियानी, प्रांत सहसचिव अनिरुध्द गुप्ते, जिल्हा सचिव प्रकाश भुजाडे इत्यादींची उपस्थिती होती.

