Home नागपूर (BMS) च्या 18 व्या त्रैवार्षिक परिषदेत नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा:

(BMS) च्या 18 व्या त्रैवार्षिक परिषदेत नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा:

68 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर, २७ फेब्रुवारी
शुक्रवारी नुकत्याच झालेल्या अखिल भारतीय खदान मजदूर संघ (BMS) चे 18 वे त्रैवार्षिक अधिवेशन उत्कर्ष मंडळ, खापरी, वर्धा रोड, नागपूर, महाराष्ट्र येथे झाले. याप्रसंगी भारत सरकारचे कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी हे प्रामुख्याने उपस्थित होते. आभासी माध्यमांद्वारे उद्घाटन समारंभात त्यांनी भाग घेतला. भारतीय मजदूर संघाचे (BMS) राष्ट्रीय अध्यक्ष हिरण्यमय पंड्या यांच्या हस्ते आयोजित परिषदेचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कुटुंब प्रबोधनचे समन्वयक रवींद्र जोशी, बीएमएसचे कोळसा प्रभारी के. लक्ष्मा रेड्डी जी, राष्ट्रीय मंत्री सुरेंद्र कुमार-पांडे आणि विदर्भ प्रदेशाध्यक्षा श्रीमती शिल्पा देशपांडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
अधिवेशनादरम्यान अखिल भारतीय खदान मजदुर संघाच्या नवनियुक्त कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. टिकेश्वर सिंग यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. सुधीर घुरडे यांची महामंत्री म्हणून फेरनिवड, महेंद्र सिंग यांची कार्याध्यक्षपदी तर आशिष मूर्ती यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी इतर कार्यकारिणी सदस्यांचीही निवड करण्यात आली. असे एका प्रसिद्धीपत्रकात प्रसन्न बारलिंगे यांनी म्हटले आहे.