Home नागपूर विविध विकास कार्यामुळे नागपूर शहराचा चौफेर विकास – केंद्रीय रस्ते वाहतूक ,...

विविध विकास कार्यामुळे नागपूर शहराचा चौफेर विकास – केंद्रीय रस्ते वाहतूक , महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन

13 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

नागपूर 27  फेब्रुवारी  2022

विविध विकासकार्यामुळे नागपूर शहराचा  चौफेर विकास   होत आहे. एम्स,आयआयएम,ट्रीपलआयटी , मेट्रो,डबल डेकर पूल यासारख्या विकासकामासाठी मागील 7 वर्षाच्या खासदारपदाच्या  कार्यकाळात 86 हजार कोटीचे कामे   झाल्याची माहिती   केंद्रीय रस्ते वाहतूक ,  महामार्ग मंत्री  नितीन गडकरी  यांनी  दिली . केंद्रीय  रस्ते निधीतून शहरात तब्बल  165 कोटी रुपयाच्या तरतुदीने  निर्माण होणा-या 9.8 किमी   रस्त्याचे भूमीपूजन आज त्यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

नागपूर महानगरपालिकेद्वारे नवीन शुक्रवारी चौकातील  रामजीवन चौधरी यांच्या नावाने उभारलेले क्रीडा संकुल हे बॅडमिंटन, इनडोर गेम्सचे हॉल सुविधेने सुसज्ज  आहे. दक्षिण नागपूरमध्येही चांगले क्रीडांगणे तयार होत आहेत. खेळाची संस्कृती येथे  रुजत आहे. रेशीमबागात मोठे क्रीडा संकुल बांधू अशी घोषणा त्यांनी केली. याप्रसंगी शुक्रवारी तलाव टी पॉईंट  ते अशोक चौक या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरणाचे भूमीपूजन त्यांच्या हस्ते झाले. या  रस्त्यासाठी सीआरआयएफ-केंद्रीय  रस्ते  निधीतून 24 कोटी रुपये मिळाले असून हा रस्ता 4 ते 6 महिन्यात पुर्ण होईल असे त्यांनी सांगितल. अमरावती रोड तसेच उमरेड रोडवरही उड्डाणपूल प्रस्तावित आहेत. फुटाळा तलावातील दर्शक गॅलरी तसेच संगीत कारंजे यांच कामही 4 महिन्यात पूर्णत्वास जाईल , असे त्यांनी सांगितले. सिम्बॉयसिस, क्रीडा प्राधिकरणा सारखे प्रकल्प पुर्व नागपूरात आले आहेत.  आयएमएस प्रकल्प हा पुर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न  चालू आहेत. याकरिता एफसीआय चे गोडाऊन  सिंदी रेल्वेच्या मल्टीमोडल हबकडे वळविण्यात येईल .या प्रकल्पात  ज्यांचे घर  जागाचे अधिग्रहण होईल त्यांना उत्तम घरे देऊन त्यांचे  पुर्नवसन करु , असे त्यांनी सांगितल.

 मनीष नगर मध्ये अनधिकृत लेआउट मध्ये काही नागरिकांनी जागा घेतल्या होत्या तिथे महानगरपालिकेच्या द्वारे भूखंड नियमीतीकरण करुन  आता सुविधा उपलब्ध  करण्यात आले आहेत. मनीष नगरच्या नाल्यापासून सरळ शंकरपूर पर्यंत सुद्धा रोड केल्याने मिहानशी कनेक्टिव्हिटी वाढल्याने मनिष नगरमधील कोंडी कमी होण्यास तसेच   जागाच्या किमती कमी होण्यास मदत मिळेल असेही गडकरी यांनी सांगितले. वर्धा रोडवरील नवीन बांधकामामुळे नागपूर ते वर्धा हे अंतर कमी झाले आहे ब्रॉडगेज रेल्वे मुळे हे अंतर केवळ अर्ध्या तासात कापता येईल कापता येईल अशी सुविधा निर्माण होणार आहे अशी माहिती  त्यांनी दिली. देशातील पहिला उड्डाणपूल हा नागपुरात झाला असे सांगून असाच उड्डाणपूल पुणे ते शिरूर या मार्गावर बांधला जात असल्याचे गडकरी यांनी सांगितलं.

नागपूरच्या विविध  भागात  झालेल्या या कार्यक्र्मात स्थानिक लोकप्र्तिनिधी नागरिक उपस्थित होते.