Home मुंबई बसपाच्या राज्यस्तरीय संपर्क अभियानाचा शुभारंभ!

बसपाच्या राज्यस्तरीय संपर्क अभियानाचा शुभारंभ!

23 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल ;

राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या जयंतीचे औचित्य साधत बसपाच्या राज्यस्तरीय संपर्क अभियानाचा शुभारंभ;

मुंबई, २३ फेब्रुवारी

थोर समाजसुधारक राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या जयंतीचे औचित्य साधत पूर्व विदर्भातील महत्वपूर्ण अशा गोंदिया शहरातून बहुजन समाज पार्टीच्या राज्यस्तरीय संपर्क अभियानाचा आज, बुधवारी शुभारंभ झाला. यानिमित्त पक्षाचे प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना साहेब आणि प्रदेशाध्यक्ष मा.अँड.संदीप ताजने साहेब यांच्या उपस्थितीत शहराच्या मध्यभागी स्थित भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करीत अभिवादन करण्यात आले. शहरातील गुरू नानक ऑडिटोरियम येथे आयोजित कार्यक्रमात पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांनी गर्दी केली होती.

यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना मा.प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने म्हणाले की, समाज सुखासाठी अविरत ‘श्रमसाधना’ हेच गाडगे बाबांचे अभंग होते. अशात राष्ट्रसंत गाडगे बाबांच्या स्वप्न पूर्ततेसाठी राज्यात ‘सर्वजन हितकारक’ आणि ‘सर्वजन सुखकारक’ बहुजन समाज पार्टीला बळकट करणे आवश्यक आहे. राज्यात वेगाने पक्षविस्तार होत आहे. केवळ पक्षविस्तार आणि पक्षविचारांवर त्यामुळे लक्ष केंद्रित करणे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांचे कर्तव्य आहे. वायफळ चर्चेतून लक्षापासून भरकटवण्याचा प्रयत्न केला जाईल. पंरतु, न डळमळता पक्षासोबत एकनिष्ठ राहून कार्यरत राहण्याचे आवाहन यावेळी अँड.ताजने यांनी केले.

पुरोगामी महाराष्ट्रात शाहु-फुले-आंबेडकरांच्या विचारधारेवर चालणारे सरकार बसवण्यासाठी आणि शासनकर्ती जमात होण्यासाठी पक्षाने कंबर कसली असून जय्यत तयारी सुरू आहे. त्यामुळे केवळ पक्षविस्ताराकडेच कॅडरने लक्ष केंद्रित करीत संघटन बांधणीच्या कामासाठी लागावे, असे आवाहन देखील अँड.ताजने यांनी केले.

पुर्व विदर्भातून पक्षाच्या संपर्क अभियानाला सुरूवात करण्यात आल्याने राज्यात निर्माण झालेले ‘बसपा’मय वातावरण आणखी बहरेल. बसपाचे संघटन बळकट होत असल्याने राज्यातील विरोधक अस्वस्थ झाले आहेत. अशात कार्यकर्त्यांच्या मनात कलुषीत विचार पेरण्याचे प्रयत्न केले जावू शकतात. पंरतु, कार्यकर्त्यांनी आपसात मतभेद न ठेवता मान्यवर कांशीराम यांच्या विचाराने प्रेरित पक्षसंघटनेसाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या मा.सुश्री बहन मायावती जी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहीले पाहिजे, असे आवाहन प्रदेश प्रभारी मा.प्रमोद रैना यांनी केले.

कार्यक्रमात प्रदेश सचिव अविनाश वानखडे,जिल्हा प्रभारी विलास राऊत, जिल्हा अध्यक्ष दिनेश गेडाम, जिल्हा उपाध्यक्ष कैलास बोरकर, जिल्हा कोषाध्यक्ष नूरलाल उके, प.स सदस्य राहुल मेश्राम तसेच इतर प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतक उपस्थित होते.