Home नागपूर हितसंबंध जोपासून संत गाडगेबाबां चा खरा विचार जपा. आणि बहुजन समाजाला मजबूत...

हितसंबंध जोपासून संत गाडगेबाबां चा खरा विचार जपा. आणि बहुजन समाजाला मजबूत करा. धोबी समाज भाईचारा सभा संपन्न.

19 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल ;

दक्षिण पश्चिम विधानसभा बहुजन समाज पार्टी च्यावतीने 146 व्या संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त धोबी समाज भाईचारा सभा संपन्न झाली. कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख उपस्थितीत अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश कोषाध्यक्ष व दक्षिण पश्चिम इन्चार्ज यांनी मार्गदर्शन व आपले मत मांडले. त्याचप्रमाणे बामसेफचे युवा अतुल पाटील यांनीसुद्धा धोबी समाजाच्या आर्थिक-सामाजिक शैक्षणिक रोजगार, विकास याबद्दल मार्गदर्शन करून राजकीय सत्तेमध्ये समाजाची भागीदारी फार अल्प प्रमाणात असून समाजाने एक जुट राहून बहुजन समाज पार्टीच्या बॅनर खाली येऊन सत्ता प्राप्त करावी व व आपले हितसंबंध जोपासून संत गाडगेबाबांच खरा विचार समाजाने प्रेरित घेऊन फुले शाहू आंबेडकरी विचारधारा या एकमेव पार्टीला म्हणजेच बहुजन समाज पार्टीला मजबूत करावे अशा प्रकारचे आवाहन त्यांनी समाजाला केले. त्यांनी धोबी समाज संघटनेचे अध्यक्ष गणेश चौधरी यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे नवनियुक्त दक्षिण पश्चिम प्रभारी मा.डॉ.चांगदेव शेंडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमांच्या अध्यक्षतेखाली महेंद्र रामटेकेनी बहुजन समाज पार्टी ही एससी, एसटी, ओबीसी, समाजामध्ये भाई चारा तयार करून बहुजन समाज हा बऱ्याच वर्षापासून केंद्रशासित राहिला नसून आता खरी वेळ आली आहे की सर्व बहुजन समाजाने एकत्र येऊन सत्ता स्थापन करून ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या समाजामध्ये संघर्ष केला आहे त्या महापुरुषांचे स्वप्न पूर्ण करणे हे आज काळाची गरज आहे. त्यामुळे धोबी समाजाने सुद्धा आपले अंधश्रद्धा व रूढी परंपरा दूर करून फुले-शाहू-आंबेडकरी व गाडगे महाराजांच्या विचारांची कास धरावी व बहुजन समाज पार्टीला मजबूत करावे आणि येणाऱ्या नागपूर शहरांमध्ये बहुजन समाज पार्टी चा महापौर बनवण्यासाठी समाजाने मोठ्या प्रमाणात समर्थ देऊन आपले शक्ती प्रदर्शन करावे. कार्यक्रमाला बहुजन समाज पार्टीचे अध्यक्ष दक्षिण पश्चिम विधानसभा व आयोजक ओपूल तामगाडगे यांनी संचालन केले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या टीव्ही वार्ड नवनियुक्त अध्यक्ष नितेश कनोजिया धोबी समाûज यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी मुन्ना कनोजिया, संजय कनोजिया, गोपाल बैसवारे, सविताबाई कनोजिया, दीप समुद्रे, कुणाल खरे, राहुल तोमस्कर, त्याचप्रमाणे विधानसभा कमिटीचे विशाल बनसोड महासचिव, सेक्टर अध्यक्ष नरेंद्रनगर सुंदर भलावी, हर्षवर्धन जी बे, कोषाध्यक्ष, राजेश बाडेल, बडे भाऊ मेश्राम उपाध्यक्ष, यांनी कार्यक्रमाला यशस्वी केले, व परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन विधान सभेचे सचिव सुरेंद्र डोंगरे यांनी मानले.