Home नागपूर नैसर्गिक/ सेंद्रिय शेती-चर्चासत्राचे आयोजन रवीवारी;

नैसर्गिक/ सेंद्रिय शेती-चर्चासत्राचे आयोजन रवीवारी;

24 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल ;

 दि.२४ फेब्रुवारी रोजी पत्र परिषद आयोजित करण्यात आली असून कार्यक्रम : नैसर्गिक/ सेंद्रिय शेती-चर्चासत्र (विदर्भ)
दि.२७ फेब्रुवारी २०२२ रविवार सकाळी १०.३० ते ५.०० स्थळ : माई मोतलग सभागृह सेवासदन, सिताबर्डी
आयोजक: सीड रुरल Regd. No. : MAH/489/2002
(श्री समर्थ एन्टायर एलीगंट डेवलपमेंट सोसा,नागपूर) स्पीड इंडिया :Regd.No.: MAH/505/2002 (श्री स्वामी समर्थ प्रबोधीनी फॉर एन्टायर एलीगंट डेवलमेंट सोसा. नागपूर)
उपरोक्त दोन्ही NGO हया ग्रामीण / शहरी भागातील विविध समस्यांवर कार्यरत आहेत.
सीड रुरल हया संस्थेने महिलांच्या “स्वयं सहायता गट” हया क्षेत्रात “नाबार्ड’ च्या
सहयोगाने अनेक ठिकाणी हे बचत गट निर्माण केले असून महिलांना आर्थिक दृष्टया सक्षम करणे, तसेच केंद्रिय आणि राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या योजना / धोरण हयाचा प्रसार व प्रचार शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे हा हेतू आहे. सध्या शेतकरी हा संभ्रमावस्थेत आहे. त्याचे कृषी उत्पन्न वाढावे व जमिनीचा पोत पण कायम रहावा, हया उद्देशाने त्याने भारतीय कृषी तंत्रज्ञान आधारित नैसर्गिक / सेंद्रिय शेतीची कास धरावी, हया हेतूने हया क्षेत्रात मान्यवरांनी जे विविध प्रयोग केले आहेत त्यांचा प्रसार होऊन ते शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने चर्चासत्राचे आयोजन केले आहे.
चर्चासत्रातील
*पहिले ले वक्ते* : राजेन्द्र काळे हे नागपूरातील प्रख्यात कृषी मार्गदर्शक असून औषधी वनस्पती लागवड क्षेत्रात त्यांचा चांगला अनुभव आहे.
*२ रे वक्ते*: राजेश गायधनी, लाखनी हे नैसर्गिक / सेंद्रिय शेती व्यवस्थापन हया
विषयांवर आपले विचार मांडणार आहेत.
*३ रे वक्ते*: एकनाथ बोडके, पुणे हे प्रगतीशील शेतकरी असून हयांनी केलेल्या अनेक
प्रयोगातून लघूभूधारक (कमी कमी १ एकर शेती असलेला) शेतकरी देखील स्वंयपूर्ण होवू
शकतो, हे त्याचे प्रयोगीक उदबोधनातून सादर करणार आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांनी हया संघीचा लाभ घ्यावा या हेतूने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे. पत्रपरिषद मध्ये चर्चा सत्र संदर्भात डॉ. राजीव पोतदार, अध्यक्ष सीड रुलर आणि अशोक पांडे अध्यक्ष स्पीड इंडिया, संजय पाठक, विजय भागडीकर, आणि प्रकाश तांबोळी यांची उपस्थिती होती.