Home नागपूर तेली समाज संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा रविवारी;

तेली समाज संघटनेच्या वतीने राज्यस्तरीय मेळावा रविवारी;

21 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल ;

“ एकमेकां सहाय्य करू, अवघेचि धरू सुपंथ ” या उक्तीप्रमाणे ” आपलं तेली समाज संघटन, महाराष्ट्र राज्य ” हे राज्य पातळीवर कार्यरत असलेले तेली समाज संघटन आहे. या संघटनेच्या मोफत वधू-वर सुचक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी तेली समाज बांधव-भगिनींना एकत्र आणण्याचे उद्दिष्ट्य पूर्ण करण्याकरीता नागपूर शहरात आपलं तेली समाज संघटन, महाराष्ट्र राज्यचा मेळावा दि. 27 फेब्रुवारी 2022 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केला आहे. यावेळी नागपूर विभागातील नागपूर / भंडारा / गोंदिया / वर्धा / चंद्रपूर / गडचिरोली या जिल्हातील आणि तालुका पातळीवरील सर्व पदाधिकारी सहकुटुंब आणि इस्टमित्रांसह उपस्थित राहणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गुणवंत वाडीभस्मे, मुंबई यांनी संघटनेच्या नागपूर विभागाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी नागपूर रहिवासी विलासजी सुभाषराव बुटले आणी अजय कुष्णाजी हिंगे यांचेकडे दिली आहे.
या मेळव्यात तेली समाजातील मान्यवर सौ. मनीषाताई धावडे, उपमहापौर, नागपूर महानगर पालिका, उमेशजी शाहू- राष्टीय अध्यक्ष, भारतीय तैलिक साहू-राठोर महासभा आणि राजेश समर्थ-डायरेक्टर, हार्मोनी इव्हेंट्स, नागपूर इत्यादी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
“आपलं तेली समाज संघटन, महाराष्ट्र राज्य ” एक शक्ती आहे. आपल्या तेली समाजाची ताकद आहे. समाजाला एकत्र जोडण्याचे महाराष्ट्र राज्य पाळीवरील व्यासपीठ आहे. त्यामुळे सर्व पालकांची, समाज बांधव-भगिनींची जबाबदारी आहे कि समाजाचे आपण काही देणे आहोत या सामाजिक जाणिवेतून एकत्रीत येण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. गुणवंत वाडीभस्मे, मुंबई यांनी सर्व तेली समाज बांधव-भगिनींना या पदाधिकारी मेळावा कार्यक्रमाचे निमित्ताने करीत आहे. या कार्यक्रमात आपलाहि सहभाग दर्शवावा
अशी तेली समाज बांधव-भगिनींना विनंती आहे.
जय संताजी !