Home सामाजिक शिवजयंती निमित्ताने सेवाभावी उपक्रम ;

शिवजयंती निमित्ताने सेवाभावी उपक्रम ;

36 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

उमरेड (नागपूर)दि २१ फेब्रुवारी २०२२ सोमवार*
      शिवसाम्राज्य ग्रुप उमरेड तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा 2022 निमित्ताने उमरेड शहरातील न प  बुधवारी प्राथमिक शाळेच्या सभागृहात निःशुल्क ई – श्रम कार्ड चे नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात मध्ये 65 नागरिकांची नोंदणी करण्यात आली . कार्यक्रमाचे उद्घाटन मा आमदार  राजुभाऊ पारवे यांच्या हस्ते करण्यात आले तर उमरेड तहसीलदार मा संदीप पुडेंकर , नायब तहसीलदार मा  प्रदीप वर्पे , मा नगरसेवक महेश भुयारकर प्रामुख्याने उपस्थित होते .
सर्व प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले
 या वेळी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करीत उपक्रमाला शुभेच्छा दिल्या  ग्रुप चे अध्यक्ष मोनिष अठ्ठरकर यांनी आपल्या प्रस्ताविकातून मागील चार वर्षांपासून राबवित असलेल्या कार्याचा अहवाल सादर केला
 कार्यक्रमाचे संचालन सोहन उरकुडे तर सागर सोनकुसरे यांनी  उपस्थितांचे आभार मानले .
   या कार्यक्रम प्रसंगी  जेष्ठ नागरिक विनायक सावजी , दामोदर अठ्ठरकर यांचा सत्कार करण्यात आला सोबतच ग्रुप तर्फे  वर्ष भरात राबविण्यात  येणाऱ्या
 स्पर्धा या मध्ये प्राविण्य प्राप्त करणाऱ्या स्वयंसेवकांना मान्यवरांचा हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले यामध्ये अनिरुद्ध तळेगावकर , शुभांगी लामसोंगे  , तेजु बनकर , सुरभी कागदेलवार,रेचल मुळे , चेतन पडोळे, निखिल नखाते  आणि
स्वयंसेवक युवा मंडळ आमगाव, वसंत क्रीडा मंडळ तांबेखणी ,भीम कन्या युवती मंडळ तिरखुरा या युवा मंडळा पण पारितोषिक वितरण करण्यात आले
 यशस्वीते करीत अभिजित सवाईमुल ,मिलिंद घोलर , धनंजय गुंफलवार ,रजत डेकाटे यांनी सहकार्य केले.
✍ *नंददत्त डेकाटे //नागपूर जिल्हा प्रतिनिधी*