Home इतर युवा मोर्चा व महिला प्रकोष्ट शाखेची स्थापना

युवा मोर्चा व महिला प्रकोष्ट शाखेची स्थापना

40 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपुर
चेंडकापूर येथे गोंडवाना गणतंत्र पार्टी व गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा व महिला प्रकोष्ट शाखेचे स्थापना १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तिरुमाल सुधाकरजी आत्राम प्रदेश महामंत्री होते तर प्रमुख पाहुणे म्हणून तिरुमाल राजेशदादा इरपाते प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा, ऍड.आशिष उके प्रदेश प्रवक्ता गोंडवाना गणतंत्र पार्टी, धनराज मडावी नागपूर जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी, सौरभ मसराम जिल्हा अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा, प्रवीण मडावी नागपूर जिल्हा उपाध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा, गणपतराव वाढीवे कळमेश्वर तालुका अध्यक्ष, दिनेशदादा सिडाम नागपूर शहर अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी, उमेशदादा टेकाम नागपूर शहर संघटक महामंत्री गोंडवाना गणतंत्र पार्टी, प्रवीण उइके विदर्भ संघटक गोंडवाना गणतंत्र पार्टी युवा मोर्चा, लक्ष्मीकांत उइके उपाध्यक्ष काटोल तालुका, उपाध्यक्ष ईश्वर धुर्वे शाखा संघटक चेंडकापूर शाखा, प्रतिमाताई मडावी प्रदेश अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ट, सुनीताताई उइके नागपूर जिल्हा संघटक गोंडवाना गणतंत्र पार्टी महिला प्रकोष्ट, सत्यफुला मडावी जिल्हा महामंत्री, योगीताताई मसराम शहर अध्यक्ष, वंदनाताई भलावी पारशिवानी तालुका अध्यक्ष, पंधरेताई आणि इतर सर्व मान्यवर महिला प्रकोष्ट हजर होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी दर्शन गावंडे समाजसेवक, कमल नारायण उइके समाजसेवक, यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. माळेगाव चेंडकापूर, सोनखांब, बोरडोह, पठार, डोंगरगाव, नांदोरा इत्यादी गावातील असंख्य आदिवासी समाज व समस्त चेंडकापूर गाववासी हजर होते.