Home नागपूर नागपूरचा शाश्वत साखरकर इतिहासात सेट उत्तीर्ण

नागपूरचा शाश्वत साखरकर इतिहासात सेट उत्तीर्ण

21 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

नागपूर: महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (एमएन सेट) सहाय्यक प्राध्यापक, अधिस्वीकृती विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे महाराष्ट्र व गोवा राज्याच्या विविध जिल्हानिहाय केंद्रावर विविध विज्ञान विषयांकरिता घेण्यात आली होती. त्याचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला असून त्यात नागपूरच्या शाश्वत कल्याण साखरकर ने सहाय्यक प्राध्यापकांकरिता महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा इतिहास या विषयात उत्तीर्ण केलेली आहे. , विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता विविध विज्ञान विद्याशाखेतील विषयांकरिता नेटची परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेपेक्षा अवघड परीक्षा महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा असल्याचे मत सेट उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी व्यक्त केले आहे.

 

शाश्वत कल्याण साखरकर हा समाजशास्त्र विषयाने अभ्यासक प्रा.डॉ.कल्याण रामचंद्र साखरकर व डॉ. रुपाली कल्याण साखरकर यांचा मुलगा आहे. शाश्वत ने एम.ए.इतिहास विषयाची पदव्युत्तर पदवी घेतली असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर इतिहास संशोधन केंद्रात ‘भारतीय संविधान सभेतील महिला सदस्यांच्या योगदानाचे ऐतिहासिक विश्लेषण’ या विषयावर आचार्य पदवीकरिता संशोधन कार्य डॉ. संदीप हातेवार, कला व विज्ञान महाविद्यालय, पुलगांव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु केले आहे.

 

शाश्वत कल्याण साखरकर ने राज्य पात्रता परीक्षेकरिता अथक परीश्रम घेतले आहे. याशिवाय कुटुंबातील संशोधनात्मक शैक्षणिक पर्यावरणाचा शतप्रतिशत फायदा झाला आहे.

शाश्वत कल्याण साखरकर ने इतिहास विषयात महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल डॉ. संगीता मेश्राम, प्राध्यापक व इतिहास विभाग प्रमुख राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठ, डॉ. शुभा जोहरी, डॉ.एस.आय. कोरेटी, डॉ.संदीप हातेवार, डॉ. रवी खनगई, डॉ. विनायक साखरकर, डॉ.अशोक बोरकर, डॉ.पी.डी.निमसरकार, डॉ.मनिष वानखेडे, प्राचार्य संजय खडसे, प्राचार्य गणेश पाटील, डॉ. विकास जांभुळकर, माजी परीक्षा नियंत्रक देवराव कुंभारे, अमर बागडे, डॉ. प्राचार्य एम. व्ही. कोल्हे, डॉ. प्राचार्य चंदनसिंह रोटेले, डॉ.गहुल भगत, विरेंद्र साखरकर, डॉ. गोपीचंद निर्वोते, प्रा.दीपक उत्तरवार, सुदर्शन साखरकर, अजय गायगोवाल, अरुण गायगोवाल, डॉ.संदीप चौधरी, डॉ. राजेंद्र गोणारकर, विकास भगत इत्यादींनी हार्दिक अभिनंदन केले.