Home नागपूर वनौषधी क्षेत्राच्या विस्तारासाठी लोक सहभागाची आवश्यकता. मंगेश देशमुख

वनौषधी क्षेत्राच्या विस्तारासाठी लोक सहभागाची आवश्यकता. मंगेश देशमुख

21 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

डॉ. पंजाबराव देशमुख लोक विद्यापीठ नागपूर यांना वनौषधी क्षेत्राच्या विस्तारासाठी लोक सहभागाची आवश्यकता ……

डॉ. पंजाबराव देशमुख लोकविद्यापीठ, नागपुर यांना वनौषधी क्षेत्राच्या विस्तारासाठी, लोकसहभागाची आवश्यक्ता आहे. महाराष्ट्र शासनाला, 25 वर्ष कृषि विकास आराखड्यामध्ये, डॉ.एम.एस.स्वामिनाथन समितीने केलेल्या शिफारशीनुसार, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष आत्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद उपाध्यक्ष, आत्मा यांच्या, कृषि तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा या सामाजिक संस्थेला 2 वर्षापासुन राधास्वामी सत्संग ब्यास गेट क्र. 5 समोर, दहेगांव, ता. कळमेश्वर येथे संस्थापक अध्यक्ष राजेश उत्तमानी यांनी डॉ. पंजाबराव देशमुख लोकविद्यापीठ सुरु केले आहे . या लोकविद्यापीठाच्या माध्यमातुन आंबा, पेरु, सिताफळ, मोसंबी, जांभुळ आणि बांबु या पिकाचे बाबत उत्सुक शेतकरी यांना मार्गदर्शन केल्या जाते. नागपुर विभागातील वर्धा, भंडारा, चंद्रपुर, गडचिरोली या जिल्ह्यात डॉ. स्वामिनाथन समितीच्या तत्वज्ञानानुसार लोकविद्यापीठाचा विस्तार करणे उद्दीष्ट आहे. वनौषधी क्षेत्रात असलेला वाव लक्षात घेता, डॉ. पंजाबराव देशमुख लोकविद्यापीठाने आपल्या प्रक्षेत्रात वनौषधी रोपवाटीका निर्मिती करणे, उत्पादीत झालेले वनौषधी प्रक्रीया करणे, इतर शेतकऱ्यांकडून वनौषधींचे उत्पादन संकलीत करणे, या शिवाय ज्या ज्या उत्सुक व्यक्तीकेडे वनौषधी बाबत नाविण्यपुर्ण संकल्पना आहेत त्या सर्वांचा लोकविद्यापीठाला मोनो लोकसहभाग हवा आहे. असे लोक विद्यापीठ, महासंचालक डॉ. मंगेश देशमुख यांनी प्रसिद्धीस दिले आहे.