Home नागपूर महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) नागपूर आणि नागपूर मध्यवर्ती कारागृह यांच्या...

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) नागपूर आणि नागपूर मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने १० दिवसीय प्रशिक्षण

30 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) नागपूर आणि नागपूर मध्यवर्ती कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने कारागृहातील महिला बंदिवानांच्या सुधारणा व पुनर्वसन करीता कौशल्य विकास व्यावसायिक “कागदी पिशव्या, लिफाफे व फाईल मेकिंग” या १० दिवसीय प्रशिक्षणाचा समारोपीय कार्यक्रम श्री अरुण कबाडे, महा प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र, केंद्रीय कार्यालय, पुणे, श्री वैभव काळे, क्षेत्रीय प्रबंधक, बँक ऑफ महाराष्ट्र, नागपूर झोन, श्री. अनुप कुमार कुमरे, कारागृह अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह नागपूर व आरसेटी संचालक श्री. संतोष रामगिरवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता या प्रसंगी श्री अरुण कबाडे यांनी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थीना प्रेरणादायी प्रशिक्षणाने ध्येयवादी व्हा असे आवाहन केले.या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महिला बंदिवानांना कागदी पिशव्या, लिफाफे व फाईल तैयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते. उपस्थितांना संबोधित करताना कबाडे यांनी प्रशिक्षणार्थीना स्वयंरोजगाराच्या मार्गावर वाटचाल करण्याकरिता प्रोत्साहित केले. ते म्हणाले सर्वांनी पुढच्या भविष्यासाठी स्वत:ला तयार केले पाहिजे. .काळे यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले कि प्लास्टिक पिशव्यांचा अति वापर हा निसर्गासाठी तसेच सर्व प्राणीमात्रा साठी नुकसानकारक आहे. तेव्हा या व्यवसायाला अधिक चालना देणे हि काळाची गरज आहे.आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेचे संचालक, श्री. संतोष रामगीरवार यांनी आर सेटी, नागपूर द्वारे सुरु असलेल्या विभिन्न उपक्रमांची माहिती दिली तसेच प्रशिक्षणार्थीना संदेश दिला कि त्यांनी स्वयंरोजगार आणि उद्योजकतेचा मार्ग अंगीकारावा व नव्याने आयुष्याची सुरुवात करून स्वयंरोजगारद्वारे इतरांना नौकरी देण्याची क्षमता विकसित करावी.या प्रसंगी प्रशिक्षणार्थीना मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. प्रशिक्ष्णार्थिनी या दरम्यान आपले मनोगत देखील व्यक्त केले. श्री. रामगीरवार सर यांनी उपस्थित अतिथी व कारागृह प्रशासनाचे आभार व्यक्त केले.