विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर
आंबेडकरी विचाराची ताकद जेव्हा पंर्यत गांधी वादी शक्ती सोबत होती तेव्हा पंर्यत प्रतिगामी विचारधाराला राजकिय पटलावर येणे शक्य झाले नाही परंतु पुरोगामी विचारांचा विचारामधे फाटाफूट झाली तेव्हाच राजकीय चित्र वेगळे निर्माण झाले जर आजपण या दोन्ही विचाराधारा एकत्रितपणे जवळ आले तर सामाजिक शैक्षणिक राजकीय परिवर्तन घडवून आणले जावू शकते असे प्रतिपादन नारायण बागडे यांनी केले ते आंबेडकरी विचार मोर्चा च्यावतीने कास्टाईब कर्मचारी संघटनेच्या कार्यालयात महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्त गांधींच्या प्रतिमेला हार अर्पण करून आदरांजली वाहिली. गांधीजी आपल्यामागे मौल्यवान विचार सोडून गेले आहेत गांधीजीचे विचार म्हणजे भारताची ओळख असे म्हटले जाते. आंबेडकरी विचारसरणी यांची आवश्यकता या विषयावर आयोजित परिसंवादात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवी तन्हा नागपुरी तर प्रमुख वक्ते अँड. सुरेश घाटे, माजी आमदार भोला बढेल, नामदेवराव निकोसे, सुभाष बढेल, राजुदादा पांजरे, देवेंद्र बागडे, हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामभाऊ वाहने, यांनी केले तर आभार प्रदर्शन हंसराज उरकुडे यांनी केले. कार्यक्रमाला पढंरी बागडे, विजय मुन, शंकर ढेगंरे, रोशन अरखेल, राजकुमार वाघाडे, शालिक बांगर, आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
Post Views:
20


