Home नागपूर टोल बंद करनार असा ईशारा आम आदमी पार्टी ने दिल्यानंतर गतीरोधकाचे काम...

टोल बंद करनार असा ईशारा आम आदमी पार्टी ने दिल्यानंतर गतीरोधकाचे काम तात्काळ सुरू

33 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

बाबुपेठ मध्ये होणारे सतत चे अपघात रोखण्यासाठी आम आदमी पार्टी बाबूपेठ ने चंद्रपूर बल्लारपूर राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठीकाणी आंबेडकर चौक येथे गतिरोधक देण्यात यावे या करिता मा. जिल्हा अधिकारी यांना निवेदन देऊन ही मागणी राजू कुडे यांनी रेटून धरली होती.आंबेडकर चौक हा रहदारीचा परिसर असल्याने शाळकरी मुलांचे सतत ये जा असते तिथे गतिरोधक ची अत्यंत आवश्यकता होती. परंतु संबंधित बांधकाम विभागाचे दुर्लक्षपणामुळे आज पर्यंत येथे अपघात होत होते ही समस्या तेथील नागरिकांनी जेव्हा आप चे शहर सचिव राजु भाऊ कूडे यांच्या लक्षात आनुन दिली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्या सोबत वारंवार पाठपुरावा केला. व कामात दिरंगाई होत असल्यामुळे टोल नाका बंद चा आपने इशारा दिला . इशाऱ्याची तात्काळ दखल घेऊन आज आंबेडकर चौक येथे गतिरोधक चे काम सुरू झाले या कामात आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले मुद्दा सोडविल्याबद्दल‌ स्थानिक नागरिकांनी आप चे आभार मानले यावेळी राजू भाऊ कूडे सागर बोबडे, कालिदास ओरके, चंदु माडूरवार, निखिल बारसागाडे, दीपक निपाने, सुखदेव दरुंडे, बाबाराव खडसे, प्रवीण चूनारकर, जयंत थूल, जयदेव देवगडे, अंकुश राजूरकर उपस्थित होते.