Home नागपूर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनीपत्रकार भवनात झेंडावंदन साजरा….

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनीपत्रकार भवनात झेंडावंदन साजरा….

94 views
0
विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

टिळक पत्रकार भवन आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर तसेच सरचिटणीस ब्रह्मा शंकर त्रिपाठी आणि टिळक पत्रकार भवन ट्रस्टचे अध्यक्ष तथा प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीप कुमार मैत्र यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत झेंडावंदन कार्यक्रमाला सुरुवात झाली. टिळक पत्रकार भवन  ट्रस्टचे विश्वस्त –

विश्वास इंदूरकर, प्रभाकर दुपारे, महेंद्र आंकात, संजय लोखंडे, सुरेश कनोजिया, विनय करंदीकर, महेश उपदेव, विष्णू पांडे, अरुण दिवाण, चंद्रकांत अणेकर, अनुपम सोनी, परितोष प्रामाणिक, पराग जोशी, मीरा टोळे, निलेश देशपांडे, मनोहर कोठेकर, आणि अरुण आसटकर साहेब यांची उपस्थिती होती. तसेच पत्रकार संघातील कर्मचारीगण झेंडावंदनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते. सुरक्षा उपायाचे पालन करून अल्पोपहाराने आणि कार्यक्रमाची सांगता झाली.