Home इतर आम आदमी पार्टी नागपूर तर्फे 73वा गणराज्य दिन उत्साहात साजरा

आम आदमी पार्टी नागपूर तर्फे 73वा गणराज्य दिन उत्साहात साजरा

89 views
0
वदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

1947 ला देश स्वतंत्र झाला आणि संपूर्ण भारत देशात उत्साह व आनंदाचे वातावरण तयार झाले. परन्तु देशातील नागरिकांना त्यांचे अधिकार देण्यासाठी भारताचे संविधान निर्माण करण्यात आले, ते दि 26 जनेवारी 1950 पासून लागू झाले तेव्हा नागरिकांना अत्यंत आनंद झाला. आता आम्हाला कायदेशीर वागणूक मिळेल. देशातील सर्व नागरिक समानतेने वागतील, सर्वांना सारखा न्याय मिळेल, गरीब श्रीमंत असा भेद राहणार नाही, सर्वांना सारखे शिक्षण उद्योग करण्याची समान संधी मिळेल, स्त्री पुरुष समानता लाभेल, जातीभेद – अस्पृश्यतेचा अंत होईल, कोणत्याही प्रकारचे शोषण होणार नाही, शोषण मुक्त सामाजिक राजकिय जीवनात समान संधी मिळेल, स्वातंत्र्य सैनिकांनी बघितलेले स्वप्न साकार होईल. धर्माच्या नावाखाली दुसऱ्याचा धर्माचा तिरस्कार होणार नाही. गुण्यागोविंदाने आपल्या धार्मिक आस्थे प्रमाणे वागतील कोणीही कोणाच्याही धर्माच्या नावाखाली छळ होणार नाही, हे उच्च हेतु होते. परन्तु कालांतराने राजकीय लोकांनी है हेतु बाजूला सारून जातीय, धर्मीय आणि आर्थिक फायदयासाठी स्वतंत्रतेचा वापर चालू केला.आपण काय बघतो – शिक्षणापासून गोरगरीबाना वंचित ठेवले जाते. शिक्षण काही उच्च वर्गीय लोकांची मक्तेदारी झाली आहे. प्रशासनात मोक्याच्या जागी उच्च जातींनी काबीज केल्या आहेत. दिलेले आरक्षण भरले जात नाही. बँक गरीबांना कर्ज देत नाही, मोठे उद्दोगपति कर्ज काढून पैसे परत न करता वीदेशात पळून जातात व सरकार त्याची कर्ज माफ करत आहे. गरीबानी कर्ज वापस केले नाही तर त्याची घरची हाडीमडकी लिलाव केली जाते. हा सरकारचा गरीब व श्रीमंत कडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे. आज देशात गरीब जास्त गरीब होत आहे तर श्रीमंत हे जास्त श्रीमंत होत आहे. अशा परिस्थितीत आज लोकांच्या मुलभूत गरजा पूर्ण करने आणि भारतीय संविधानानुसार नागरिकांना त्यांचे अधिकार देण्यासाठी कार्यरत असलेली एकमेव पार्टी म्हणजे आम आदमी पार्टी आहे. काल आम आदमी पार्टी मुख्य कार्यालय सिव्हिल लाइन्स नागपूर येथे गणराज्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला आहे. ध्वजारोहन पार्टी चे सर्वात वरिष्ठ कार्यकर्ता श्री हेमंत बन्सोड यांच्या हस्ते करण्यात आले. सोबत आम आदमी पार्टीचे वरिष्ठ विदर्भ संयोजक श्री डॉ देवेंद्र वानखेडे, महाराष्ट्र कोषाध्यक्ष श्री जगजीत सिंग, नॅशनल काऊसलिंग मेंबर श्री अमरीश सावरकर, महाराष्ट्र सहसचिव आई टी हेड श्री अशोक मिश्रा, नागपूर शहर अध्यक्ष श्रीमती कविता सिंघल, हेल्थ विंग अध्यक्ष श्री शाहीद जाफरी, नागपूर शहर संघटन मंत्री श्री शंकर इंगोले, विदर्भ सोशल मीडिया अध्यक्ष श्रीमती गीता कुहिकर, नागपूर शहर कोषाध्यक्ष श्रीमती शालिनी अरोरा, राकेश उराडे, नीलेश गोयल, विधानसभा संयोजक रोशन डोंगरे, श्रीकांत कामडी, लक्ष्मीकांत दांडेकर, संगठन मंत्री मनोज दफरे, संतोष वैद्य, सचिव धीरज आगाशे, अलका पोपटकर, सचिन पारधी, गिरीश तीतरमारे, गौतम कावरे, इत्यादि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिति होते. कार्यक्रमाचे संचालन गुणवंत सोमकुंवर यांनी केले, तर या कार्यक्रमाला यशस्वी बनविण्यासाठी उत्तर नागपूर विधानसभानी जिम्मेदारी सम्भालली, यात संपूर्ण नागपूर च्या सर्व विधानसभा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रम ला मोठ्या उत्साहानी साजरा केला आहे.