दत्त प्राथ. व दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी येथ प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा;

105

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

दि२६/०१/२०२२ वार बुधवार रोजी दिलीपराव सोपल प्रशाला बार्शी व दत्त प्राथमिक वि.मं. बार्शी या दोन्ही शाळेत भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी छत्रपती क्रीडा, शिक्षण व समाजसेवी संस्था,उपळाई(ठोंगे) या संस्थेच्या सचिवा सौ.तेजस्वि ताई ठोंगे प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा शिक्षणतज्ञ जयसिंगराव पाटील गुरुजी तर प्रमुख उपस्थिती म्हणून आरोग्य सेविका महामुनी मॅडम दत्त प्राथ.चे मुख्या. श्री.सादिक बागवान,सोपल प्रशालेचे मुख्या.श्री.चंद्रकांत लोखंडे सर उपस्थित होते
अध्यक्षा,प्रमुख पाहुणे व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहना नंतर उपस्थित विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली शिक्षक प्रतिनिधी म्हणून कवी युवराज जगताप सर यांनी प्रजासत्ताक दिन आपण का साजरा करतो याबद्दल तसेच या दिवसाचे महत्व किती आहे हे आपल्या मनोगतातून मांडले अध्यक्षाच्या वतीने सादिक बागवान सर यांनी ही विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले
कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.तेजस्वि ताई ठोंगे यांचे हस्ते इयत्ता :-१ ली मधील चि. कृष्णा देविदास भांगे व कु.भारती किरण गोरे यांचा वाढदिवस असल्याने पुष्पगुच्छ नारळ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या
कार्यक्रम यशस्वीतेसाठी  श्री.युवराज जगताप सर,श्री.सुनील लंगोटे,श्री.मंगेश मोरे,श्री. श्रीकांत कुंभारे,श्री.सचिन काळे ,श्रीम.संगीता काळे मॅडम,अरुणा मठपती मॅडम,सौ. विलंबिनी पाटील,सेवक श्री.संदीप भोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. श्रीकांत कुंभारे सर यांनी केले तर आभार श्री.सादिक बागवान सर यांनी मानले खाऊ वाटपाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली