Home Breaking News कोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा

कोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा

33 views
0

विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर 

कोरोनावर होमिओपॅथी औषधेही गुणकारी डॉ. रितु कोचर यांचा दावा कोरोनामुक्तीसाठी होमिओपॅथी चिकित्सापध्दतीही अतिशय गुणकारी असल्याचा दावा नागपुरातील सुवर्णपदकप्राप्त चिकित्सक डाॅ.रितु कोचर यांनी एका निवेदनाद्वारे केला आहे.कोरोनाच्या हल्लीच्या तिसर्‍या लाटेत मुख्यतः डेल्टा व्हेरियंटचा अधिक प्रादुर्भाव आहे.दररोज रूग्णांची संख्या वाढत आहे.त्यासाठी या प्रकाराची लक्षण समजून घेण्याची गरज असल्याचे सांगून त्या म्हणाल्या की, घशातील विशिष्ट प्रकारची खवखव, ताप ही त्याची प्रारंभिक लक्षण आहेत. कुणी शरिरावर बर्फ टाकल्यानंतर दुखतील अशी हाडे दुखणे, डोकेदुखी, कोरडा खोकला, एकशेदोनपर्यंत ताप वाढला तर ती कोरोनाची लक्षणे आहेत असे समजावणे व त्वरित वैद्यकीय उपचार सुरू करावेत. त्वरित प्रारंभिक उपचार केले तर रुग्णालयात दाखल होण्याची गरज पडत नाही असेही त्या म्हणाल्या.लक्षण दिसू लागतात चोविस तासांच्या आत आपण चाचणी करू शकतो. त्यासाठी 250 रूपयाच्या कीट बाजारात उपलब्ध आहेत, अशी माहितीही त्यानी दिली.क्रोसिन किंवा डोलो गोळ्यांचा स्वतःच्या मनानेच वापर करण्यापेक्षा आधी चाचणी केलेली बरी, असेही त्या म्हणाल्या.डाॅ.कोचर ( मोबाईल 7020941802) ह्या शहरातील एक सेवाभावी होमिओपॅथ असून त्या वसंतनगरमधील मंदिर परिसरातील सायंकाळी उपलब्ध असतात.