Home नागपूर Fwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी

Fwd: प्राचार्य हेमंत हजारे यांची प्राध्यापकांना शिव्यागिळ व धमकी

39 views
0

 विदर्भ वतन न्युज पोर्टल नागपूर

प्राध्यापकांची कठोर कारवाईची मागणी अन्यथा जेलभरो आंदोलन चा इशारा गुरूंनानक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉजी, दहेगाव येथील महाविद्यालयात गेल्या एक वर्षापासून कर्मचारी व व्यवस्थापण या आमच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्याच्या थकीत वेतन ला घेऊन व्यवस्थापण व कर्मचारी यांच्यामध्ये चांगलाच वाद चालू आहे व कायदेशीर मार्गाने आम्ही आमचा थकीत वेतनाचा हक्क मागण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्याच सिस्टमंडल प्राचार्य श्री. हेमंत हजारे यांच्याकडे थकीत वेतनावर चर्चा करण्यासाठी गेलो असता व्यवस्थापणाच्या वतीने प्राचार्य डॉ. हेमंत हजारे आमच्या कर्मचाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून आम्हाला बघून घेऊ तसेच मानसिक, शारिरीक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त करत आहे. तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे जा आणि तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करा.

नागपूर विद्यापिठाचे कुलगुरू सुद्धा माझे काही करू शकत नाही अशी अरेरावीची भाषा त्यांनी केली. त्यासंदर्भातील आम्ही नुकतेच कळमेश्वर ग्रामीण पोलीस स्टेशन ला प्राचार्य यांच्या विरोधात तक्रार दिली. आमच्या तक्रारीवर कळमेश्वर ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये ५०४/५०५ अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे. गेल्या एक वर्षापासून संस्थेचे डायरेक्टर डॉ.सुधीर शेळके, उप-प्राचार्य प्रा.राजेन्द्र भोंबे हे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रीत्या पूर्वनियोजित कट करून हेतु पुरस्कर आम्हाला रोज मानसिक

त्रास देत आहे. संस्था व्यवस्थापणारे अध्यक्षांनी तात्काळ प्राचार्य डॉ. हेमंत हजारे, अप्रत्यक्ष सहभागी डॉ. सुधीर शेळके आणि उप प्राचार्य प्रा. राजेन्द्र भोंबे यांच्यावर कटोर कारवाही करावी अन्यथा आम्ही सारती असोसिएशन महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर चा पाठिंबा घेऊन आम्ही सर्व संस्थेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंड पुकारून जेलभरो आंदोलन करणार आहे व पुढील होणाऱ्या

परिणामास संस्था प्रशासन जबाबदार राहणार अशी माहिती प्रविण भिसे व सारती असोसिएशन महाराष्ट्र राज्य, चंद्रपूर चे अध्यक्ष देवेंद्र सायसे यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी प्रविण भिसे, जस्पाल गिडवानी, किशोर वाघ, राजेंद्र काटोले, दिलीप बुधलानी, एकता मेश्राम, अमर बानमारे, कल्पना मालपे पत्रपरिषदेत उपस्थित होते.