Home नागपूर राष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन

राष्‍ट्रीय युवा दिनाच्‍या निमीत्‍त्‍याने रक्‍तदान शिबीराचे आयोजन

24 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर 

देशात दरवर्षी स्‍वामी विवेकानंद यांच्‍या जयंतीनिमित्‍त 12 जानेवारी हा दिवस ‘’ राष्‍ट्रीय युवा दिन’’ म्‍हणून साजरा केला जातो. याच अनुषंगाने स्‍थानिक युवकांमधे राष्‍ट्रीय युवा दिना विषयी जनजागृती निर्माण करण्‍याच्‍या उद्येशाने 12 जानेवारी रोजी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, भारत सरकारच्‍या क्षेत्रीय लोक संपर्क कार्यालय, नागपुर, नेहरू युवा केन्‍द्र, नागपुर आणि युवा चेतना मंच, कामठी तर्फे रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले.या प्रसंगी सत्‍कार मुर्ती सौ मंदाताई शेषराव आष्‍टणकर, समाज सेविका, किसना पाटील, जीवन सुरक्षा प्रकल्‍प अपघातग्रस्‍त रक्षक, रोहण अग्रवाल, भ्रमंतीवीर-प्‍लास्‍टीकमुक्‍ती भारत अभियान यांचा सत्‍कार करण्‍यात आला . या प्रसंगी नेहरू युवा केन्‍द्र, नागपुर चे श्री उदय धीर तसेच तकनीकी सहायक संजय तिवारी, यांनी उपस्‍थित युवांना स्‍वच्‍छता, सिंगल युज प्‍लास्‍टीक इत्‍यादी विषयां वर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्ष स्थानी युवा चेतना मंचचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष श्री दिलीप दिवटे उपस्‍थ्‍िात होते. तर कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक प्रा. पराग सपाटे यांनी केले. सूत्र संचालन श्रीकांत अमृतकर यांनी तसेच आभार प्रदर्शन मयूर गुरव यांनी केले. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍या करिता युवा चेतना मंच, कामठीचे प्रफुल्‍ल बावनकुडे यांनी परीश्रम घेतले. या वेळी 27 युवांनी रक्‍तदान केले तसेच 40 युवकांनी या कार्यक्रमात सहभागी होउन कार्यक्रमाचा लाभ घेतला.रक्‍तदान शिबीरला मेडीकल कॉलेज, नागपुरच्‍या प्रणाली पाटणकर, लॅब साइन्‍टीफिक ऑफिसर आणि श्रध्‍दा भोले, , आदित्‍य बोबडो, , कल्फिया शेख कृती पटले, , नितीन बलसारे, सामाजिक कार्यकर्ता यांचे सहकार्य लाभले.