*मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर चा तृतीय वर्धापनदिन सोहळा संपन्न* *******

135

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

प्रा. विजया मारोतकर
अध्यक्ष ,
माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान,
नागपूर 
*****
*मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठान, नागपूर चा तृतीय वर्धापनदिन सोहळा संपन्न* 
******* 
“साहित्याची नव नवी क्षितीजे पादाक्रांत करत,आज तृतीय वर्धापन दिना
पर्यंत पोहोचलेल्या माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानची अल्पावधीतील घोडदौड स्तंभित करणारी आहे”. असे उदगार सुप्रसिद्ध कवी रमेशचन्द्र दीक्षित यांनी काढले.मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या ऑनलाइन संपन्न झालेल्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्याच्या प्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते,यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवी उल्हास मनोहर तसेच संस्थेच्या अध्यक्ष विजया मारोतकर, उपाध्यक्ष विशाल देवतळे ,सचिव मंगेश बावसे आणि अन्य सदस्य उपस्थित होते .
मा. दीक्षित सर पुढे म्हणाले की
-“विविध साहित्यिक उपक्रमांचे आणि कार्यक्रमांचे आयोजन करत आज आपण 31 वा दिमाखदार कार्यक्रम साकार करीत आहात. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळातही मायमराठी नक्षत्र प्रतिष्ठानने हे शिवधनुष्य सामर्थ्यांने पेलत मराठीच्या पताका फडकवत ठेवलेल्या आहेत.
आपल्या स्वतेजाने तळपत असलेल्या तुम्हा सर्व नक्षत्रांचे कार्यकर्तृत्व अभिमानास्पद वाटते , याकरिता मला  आपले मनापासून कौतुक करावेसे वाटते.आपल्याला शुभेच्छा देताना मन भरून येत आहे.”
संस्थेच्या अध्यक्ष प्रा. विजया मारोतकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून मागील
तीन वर्षाच्या काळात तीस कार्यक्रम संपन्न करणाऱ्या माय मराठी प्रतिष्ठानच्या वाटचालीचा आढावा घेतला. शासन मान्यता प्राप्त झालेली ही संस्था मराठी राजभाषा दिन ,संस्थेचा वर्धापन दिवस,  आषाढस्य प्रथम दिवसे निमित्त
स्वर्गीय केशवराव मारोतकर स्मृती काव्य पुरस्कार सोहळा आणि स्व. शांताबाई खोबे “आई” कविसंमेलन या ठराविक चार कार्यक्रमां व्यतिरिक्त विविध साहित्यिक उपक्रम, पुस्तक प्रकाशन, विविध साहित्य लेखन स्पर्धा,साहित्य संमेलन  असे कार्यक्रम राबवत असतात. त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांची उपस्थिती या मंचाला लाभलेली आहे.
ज्यामध्ये आदरणीय माई सिंधुताई सपकाळ, लोकप्रिय सिने अभिनेत्री निशिगंधा वाड,  ,झी.टी.व्ही.कलाकार श्रेया  बुगडे,किशोर बळी,
सुप्रसिद्ध कवी डॉ.इंद्रजीत भालेराव,प्रा.प्रवीण दवणे , डॉ. शोभाताई रोकडे, शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे, कोल्हापूरचे साहित्यिक प्रा.ए. बी.पाटील, अरुंधती वैद्य, हिंदी कवी अनिल मालोकर, कथाकार श्रीकांत गोडबोले, सुप्रसिद्ध कादंबरीकार शुभांगीताई भडभडे,विजयाताई ब्राह्मणकर ,गोवा येथील प्रिया कालिका बापट
तसेच जळगावचे सुप्रसिद्ध कवी डॉ. वा.ना .आंधळे यांच्यासारख्या मान्यवरांचा समावेश राहिलेला आहे.त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभल्या मुळे संस्थेने आजवर प्रगती साधलेली आहे.भूतकाळाचा वेध घेत भावी संकल्पा बाबतची कल्पना दिली.
प्रमुख अतिथी मा. उल्हास मनोहर आपल्या मनोगतात म्हणाले
की-” माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांची धडपड मी जवळून बघत आलेलो आहे, अल्पावधीत या संस्थेने मराठी साहित्याच्या क्षेत्रात स्वत:चा निर्माण केलेला नावलौकिक कौतुकास्पद आहे.सर्वच सदस्य नितांत तळमळीने कार्यरत असतात ,त्यामुळे सध्या तरी मराठीच्या क्षेत्रात काम करणारी एक उत्तम संस्था म्हणून माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान या संस्थेकडे आदराने बघितले जात आहे.”
संस्थेचे उपाध्यक्ष विशाल देवतळे यांनी प्रत्येक आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना माय मराठीला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा या दृष्टिकोनातून आमची संस्था कशा प्रकारे विविध कार्यक्रमांची आयोजन करते.तसेच प्रत्येक आयोजन नितांत उंची वर जावेआणि आयोजनाचा उद्देश सफल व्हावा या करता प्रयत्न शील राहते,या दृष्टीने भूमिका स्पष्ट केली.
तर संस्थेचे सचिव मंगेश बावसे यांनी संस्थेच्या मागिल वर्षभरातील कारकिर्दीचा आढावा आपल्या अहवालातून सादर केला .
धनवटे नॅशनल कॉलेजच्या प्राचार्यपदी रुजू झालेल्या डॉ. भारती खापेकर या आमच्या संस्थेच्या सदस्य आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो अशा शब्दांत त्यांचा गौरव करून आभासी पद्धतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेच्या सदस्यांनी विविध क्षेत्रात या वर्षभरात संपादन केलेले यश, पुरस्कार तसेच साहित्य प्रकाशित झाल्या बद्दल त्यांना सन्मानित करून त्यांचा गौरव केल्या गेला.
  संस्थेच्या सर्व सदस्यांचे  साहित्य एकाच दिवाळी अंकात कसे प्रकाशित करता येईल? या दृष्टिकोनाला मूर्त रूप  देण्याच्या प्रयास करण्यात आला,त्याला यश येऊन 33 नक्षत्रांचे साहित्य कथा, कविता, लेख असे लेखन साहित्य *स्पंदन हृदयाचे* या दिवाळी अंकात प्रकाशित करण्यात आले .यात सहभागी सर्व लेखकांना
दिवाळी अंक वितरणाबाबतच्या सूचना देण्यात आली.
“नक्षत्रांचे कविसंमेलन” ची सुरुवात कवी संमेलनाचे अध्यक्ष मा. रमेशचंद्र दीक्षित यांच्या  निर्मिका ला उद्देशून त्यांनी सादर केलेल्या  *तो*   आणि प्रमुख अतिथी मा. उल्हास मनोहर यांच्या *काळोख* या कवितांनी झाली.
त्यांनतर अरुणा भोंडे, स्मिता खानझोडे ,पल्लवी उमरे, डॉ.सुनंदा जुलमे, श्रद्धा बुरले राऊत,डॉ.माधव शोभणे,ज्योती बनसोड, गोविंद सालपे, मंजुषा कौटकर, आनंदी चौधरी, नीता अल्लेवार, वैशाली मुलमुले, भूपेश नेतनराव ,विकास गजापुरे, डॉ.भारती खापेकर,विशाल देवतळे,अरुणा कडू आणि विजया मारोतकर अशा जवळपास  26 कवी ,कवयित्रीनी आपल्या  विविध कविता सादर केल्या.
ज्यामध्ये माय मराठीचा जयजयकार करणाऱ्या कवितांसह माई सिंधुताई सपकाळ, अवकाळी पाऊस , प्रीत, वीरह ,स्त्रीभ्रूणहत्या,जीवन,स्त्रीजीवन,आई अशा विविध विषयांचा स्मावेश होता.एका पेक्षा एक दर्जेदार कवितांमुळे कवी संमेलन उत्तरोत्तर उंचीवर गेले.
नीता अल्लेवार यांनी स्वागत गीत सादर केले. पहिल्या सत्राचे सूत्रसंचालन राजश्री कुलकर्णी यांनी तर कवी संमेलनाचे सूत्रसंचालन अरुणा कडू यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.माधव शोभणे यांनी केले .
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या ऑनलाइन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व नक्षत्रांच्या प्रतिसादाने कार्यक्रमाची शोभा वाढली.