किल्ले रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा !.

340

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

किल्ले रायगडावर अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा ! – हिंदु जनजागृती समितीची मागणी !

 अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर मुसलमानांनी अनधिकृत बांधकाम केल्याचे उघड झाले. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे प्रसारित झाली आहेत. किल्ल्यावरील मदार मोर्चाम्हणून प्रसिद्ध असलेल्या जागी मशीद मोर्चाअसल्याचा अपप्रचार करून त्या जागेला पांढरा रंग फासून तेथे हिरवीलाल चादर चढवण्यात आली होती. ऐतिहासिक स्थळांवर असे प्रकार होणे, हे अत्यंत संतापजनक असून रायगड किल्ल्याचे पावित्र्य भंग करण्याचा प्रकार आहे. तसेच यातून धार्मिक तेढ निर्माण करण्याचाही प्रयत्न दिसून येतो. या प्रकरणी त्वरित आवाज उठवल्याने हे अनधिकृत बांधकाम काढण्यात आले असले, तरी, हे बांधकाम कोणी केले, कोणत्या उद्देशाने केले, याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने रायगड जिल्ह्याच्या उपजिल्हाधकारी श्रीमती स्नेहा उबाळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या वेळी समितीच्या सौ. विशाखा आठवले, श्री. गिरीश जोशी आणि श्री. उदय तेली हे उपस्थित होतेमंत्रालयात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.

    किल्ले विशाळगडावर पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे १०० हून अधिक लहानमोठी अतिक्रमणे झालेली आहेत. दुसरीकडे बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी उघड्यावर आहेत. एकूणच छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवर होत असलेले अतिक्रमण हा गंभीर विषय आहे. ही अतिक्रमणे तात्काळ हटवणे, हे प्रशासनाचे कर्तव्यच आहे. या प्रकरणी ज्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे हे घडले, त्यांच्यावर आणि ज्या मुसलमानांनी हे कृत्य केले, त्या सर्वांवर तत्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी आमची मागणी आहे. तसेच किल्ले रायगडाप्रमाणे राज्यातील सर्वच किल्ल्यांच्या ठिकाणी अशी अतिक्रमणे झाली आहेत का, याचा अहवाल शासनाला सादर करून ती अतिक्रमणे तात्काळ हटवण्याची प्रक्रिया चालू करावी. आमच्या मागण्यांवर पुरातत्व खाते आणि प्रशासन यांनी कृती न केल्यास हिंदु जनजागृती समिती या प्रकरणी राज्यभरात आंदोलन छेडेल. छत्रपती शिवरायांच्या वास्तूंवर होत असलेली अतिक्रमणे कदापि सहन केली जाणार नाहीत, याची गंभीर दखल प्रशासन आणि पुरातत्त्व विभाग यांनी घ्यावी, असेही समितीने म्हटले आहे.

 

 

आपला नम्र,
 
श्री. सुनील घनवट,
राज्य संघटक, महाराष्ट्र आणि छत्तीसगड,
 हिंदु जनजागृती समिती, (संपर्क क्रमांक : 70203 83264)
2 Attachments