Home गोंदिया *स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;

*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास;

206 views
0

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

*स्वतःच्या पोटाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या बापास आजीवन कारावास *नराधम बापाला मरेपर्यंत कठोर शिक्षा*जिल्हा सत्र न्यायाधीश तथा विशेष सत्र न्यायाधीश यांचे निर्णय*                                                                      *आमगाव:-*  दिनांक 10 जानेवारी 2022 रोजी सोमवारला विशेष सत्र न्यायालय गोंदिया यांनी बाल लैंगिक प्रकरणातील आरोपी प्रल्हाद अनंतराम कोठेवार वय 40 वर्ष रा.आमगाव तालुका आमगाव जिल्हा गोंदिया यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत 20 वर्षे म्हणजेच जीवन श्रम कारावासाची शिक्षा ठोठावली
                                                                                                   सदर प्रकरण असे की दिनांक 9 डिसेंबर 2018 ला सकाळी 10 वाजता चे दरम्यान पीडितेची आई चोप नींदण्याच्या कामासाठी शेतावर गेली असता घरी पती व मुलगी हजर होते. मुलगा हा बैल चारण्यासाठी घेऊन गेला होता घरी एकटेपणाचा फायदा घेऊन आरोपीने पीडितेचे कपडे काढून तिच्यासोबत शारीरिक संबंध केले व सदर घटनेबाबत कोणाला सांगितले तर जीवाने मारण्याची धमकी दिली होती परंतु पीडित वय 12 वर्ष हिने तिची आई सायंकाळी परत आल्यावर तिच्यासमोर सदर घटनेचा सर्व वृत्तांत सांगितला यावरून त्याची आईने दिनांक 10 डिसेंबर 2018 रोजी मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्या पतीविरुद्ध आमगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली होती सदर तक्रारीच्या आधारावर तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित कदम यांनी आरोपीविरुद्ध कलम 376 -2 एफ, 376- 3 कलम 506 भादवी नोंदवून व तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते सदर प्रकरणात आरोपीविरुद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील कृष्णा डी पारधी यांनी एकूण 11 साक्षीदारांना न्यायालयासमोर तपासले एकंदरी आरोपी चे वकील व सरकारी वकील यांचे सविस्तर युती वादा नंतर माननीय न्यायालय एस ए ए आर औटी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा विशेष सत्र न्यायाधीश गोंदिया यांनी आरोपीविरुद्ध सरकारी पक्षाच्या पुरावा ग्राह्य धरून आरोपीला कलम 6 बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 प्रमाणे 20 वर्षाची म्हणजे मरेपर्यंत सश्रम कारावास व रुपये 50 हजार दंड व दंड न भरल्यास 3 वर्षाचा अतिरिक्त सश्रम कारावास तसेच कलम 506 भादवी अंतर्गत 3 वर्षाच्या सश्रम कारावास व पाच हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिन्याच्या अतिरिक्त कारावास असे शिक्षा ठोठावली तसेच सदरची एकूण रुपये 55 हजार दंडाची रक्कम पीडितेस देण्याचे आदेश केले तसेच मनोधर्य योजनेअंतर्गत पीडितेच्या पुनर्वसनासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यास योग्य सहाय्य करण्यासाठी आदेशित केले आहे सदर प्रकरणात जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात पैरवी अधिकारी पोलीस शिपाई सुनिता लिल्हारे व पोलीस शिपाई सुनील बावनकर आमगाव यांनी उत्कृष्ट काम पाहिले.