समाजभूषण व समाज गौरव पुरस्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न……

171

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरण समाज भूषण व समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा संपन्न…….
श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने गौरव पुरस्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा यासंदर्भात दरवर्षीप्रमाणे कार्यक्रम घेण्यात येत असून यावर्षी सुद्धा श्री संत जगनाडे महाराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था गंजीपेठ गांधी चौक नागपुर तर्फे संताजी महाराजांची  पुण्यतिथीनिमित्त 68 विद्यार्थ्यांना 2.30 लक्ष रकमेच्या शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले. ११ जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सायकलने नर्मदा परिक्रमा करणाऱ्या एका जोडप्याचा ही सत्कार करण्यात आला. मारोती जवंजार यांना समाज गौरव रोख ७ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानेश्वर वंजारी यांना समाजभूषण पुरस्कार व रोख ७ हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी चे कुलगुरू श्री संजय दुबे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी ज्ञानेश्वर लांजेवार, वंदना बडवाईक, बबनराव तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे अध्यक्ष किशोर वरंभे यांनी प्रास्ताविक करून श्री संत जगनाडे महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकला. राजू माहुरे व सुनिल पंचभाई यांनी संचालन केले तर दिलीप तुपकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरित्या संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सर्वश्री प्रमोद वरंभे, गणेश हटवार, शेकर महाजन, मंगेश सराटकर, लीलाधर गिरडकर, सरोज तलमले, श्रीधर वरंभे, प्रमोद फटिंग, राजू वरंभे, छाबूताई महाकाळकर, किरण पवार, कोमल हटवार, विक्की गोमासे, अभिजीत गुल्हाणे, सारंग वरंभे आणि नितीन खंते यांनी परिश्रम घेतलेत.