7 दिवसात खड्डे बुजविण्याचे आवाहन. सात दिवसात जरर का, खड्डे नाही बुजविले तर रस्त्यावरच तीव्र आंदोलनाचा इशारा….

168

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

रिंग रोड वाठोडा जुनी वस्ती नागपूर येथील प्रभाग क्र. 26 मधील नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांची भीती निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नागपूर शहर महासचिव रुपेश बांगडे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यास विभागीय अधिकारी (पूर्व ) यांना निवेदन देण्यात आले. एकच निवेदन दिले नाही तर वारंवार निवेदन दिले परंतु प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिष्टमंडळाने दोन्ही विभागास निवेदन देऊन सात दिवसात खड्डे बुजविण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावरील उतरून तीव्र आंदोलन करणार असा इशारा देखील दिला आहे.
यावेळी महासचिव रुपेश बांगडे, नथुजी दारोटे, शंकर बनारसे, प्रशांत अग्रवाल, पवन गावंडे, राजेश राजगिरे, राजेश मेंढे, प्रमोद आंबाडकर आणि बरेच कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.