डॉ. प्रशांत गायकवाड आंतरराष्ट्रीय लायन्स आयकॉनिक पुरस्काराने सन्मानित..

173

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

जगातील 47 देशांतील लोकांना भारतीयकला आणि संस्कृती शिकवण्याचा जागतिक विक्रम
नागपूर: (दि.७ जानेवारी२०२२)
संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरी बद्दल व कोरोना काळात जीवाची पर्वा न करता समाजाची सेवा करणारे,
डॉ. प्रशांत गायकवाड यांना अलीकडेच लायन्स आयकॉनिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नागपूर शहराचे महापौर दयाशंकर तिवारी आणि मुधोजी राजे भोसले यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ लायन्स क्लबच्या नागपूर शाखेच्या वतीने कोरोना काळात उत्तम काम करणाऱ्या स्वयंसेवकांचा नुकताच सन्मान करण्यात आला. बिशाप कॉटन ग्राउंडमध्ये आयोजित दिमाखादार सोहळायत हा पुरस्कार समारंभ संपन्न झाला. डॉ.गायकवाड यांना अलीकडेच जम्मू आणि काश्मीरचा  महाराजा हरीसिंग डोगरा हा प्रतिष्ठेचा सर्वोच्च सन्मान मिळाला होता. डॉ. गायकवाड यांनी आपल्या कर्तुत्वाने गिनिज बुक आफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली आहे. याशिवाय “वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड ” मध्ये जगातील 47 देशांतील लोकांना भारतीय कला आणि संस्कृती शिकवण्याचा जागतिक विक्रम यांच्या नावावर आहे. डॉ. प्रशांत गायकवाड हे ज्योतिषाचार्य म्हणून जगभरात ओळखले जाते. बेटी बचाव बेटी पढाव (भारत सरकार) मोहिमेचे ब्रँड Ambasedar आहेत. आजपर्यंत त्यांनी चार लाख मुलींना स्वसुरक्षेचे धडे दिले आहेत.