आमदार राजूभाऊ पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर तालुक्यातील कोविड – 19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.

278

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

दिनांक 07/01/2022 रोज शुक्रवारला उपविभागीय कार्यालय उमरेड येथे आमदार राजू पारवे यांचा अध्यक्षते खाली उमरेड, कुही व भिवापूर या तिन्ही तालुक्यातील कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आढावा बैठक घेण्यात आली.
उमरेड, भिवापूर व कुही तालुक्यातील काय नियोजन केलेलं आहे त्या बद्धल तिन्ही तालुक्यातील आरोग्य विभागाशी चर्चा करत पॉसिटीव्ह पेशन्ट बद्दल माहिती घेतली. लसीकरण किती टक्के झालेलं आहे व त्याला कसं वाढवता येईल यावर चर्चा करण्यात आली. तसेच उमरेड येथे CCC सेंटर ला मान्यता मिडली आहे व उद्याच ट्रामा केअर सेंटर मध्ये 40 बेड चा कोविड केअर सेंटरला सुरु करण्याचे आदेश दिले.
या बैठकी मध्ये शासनानी दिलेल्या कोविड नियमांची अंमलबजावणी करावी असेही या वेळी अधिकऱ्यांना सांगण्यात आले.
कोविड च्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सर्व उपाययोजना सज्ज ठेवण्याचे आदेश दिले.
लसीकरण, ऑक्सिजन सिलेंडर, ऍम्ब्युलन्स, ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर, कोविड चाचणी या सर्व गोष्टी सज्ज ठेवणायचे आदेश दिले.
या वेळी उपविभागीय अधिकारी चंद्रकांत खंडाईत, नागराध्यक्षा विजयालक्ष्मी भदोरिया,  तहसीलदार पुंडेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव तेळे, नायब तहसीलदार अंबादे, राठोड, वरपे, खंडविकास अधिकारी हिरुटकर, माने, मुख्याधिकारी बल्लाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. निकम, अधीक्षक डॉ. खानाम, डॉ. गणवीर, डॉ. पाटील, पोलीस निरीक्षक सोलसे, उपाध्यक्ष गंगाधर फलके, व पत्रकार बंधू संबधित विभागातील अधिकारी उपस्थित होते.