अनुकंपा तत्त्वावरील शाळां निहाय प्रतीक्षायादी बाबत आक्षेप १० तारखेच्या आत सादर करावे;

183

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर;

विषय :- अनुकंपा तत्वावरील शाळा निहाय प्रतिक्षा यादी बाबत काही आक्षेप असल्यास दि.१०.०१.२०२२ पर्यंत सादर करण्याबाबत.
महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नुसार खाजगी शाळांतील शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्राधिकारी शाळा व्यवस्थापन असल्याने त्यांची नियुक्ती, पदोन्नती, सेवासमाप्ती या बाबतचे सर्वाधिकार संस्थेस आहे. सदर्हु शिक्षण विभाग (माध्यमिक) जिल्हा परिषद नागपुर या कार्यालयात उक्त शाळा व्यवस्थापन/ शाळा प्रमुखांनी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांचे सादर केलेल्या प्रस्तावास तपासुन नियमानुसार केलेल्या नियुक्तीस मान्यता प्रदान करण्याची कार्यवाही करण्यात येते. अलिकडेच संबधित शाळांकडून प्राप्त माहितीच्या आधारे शाळा निहाय अनुकंपा तत्वावर नेमणुकी करीता आवेदन सादर केलेल्या उमेदवाराची प्रतिक्षा यादी दि. १७.१२.२०२१ रोजी www.nagpurzp.com या संकेतस्थळावर या पुर्वीच प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच जिल्हातील खाजगी शाळा मुख्याध्यापकांच्या गृपवर  पाठविण्यात आली आहे. तर शिक्षणाधिकारी (माध्य) जिल्हा परिषद नागपूर या कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावण्यात आली आहे. सदर प्रतिक्षा यादी बाबत कोणत्याही उमेदवाराचे काही आक्षेप असल्यास तसे आक्षेप या कार्यालयास दि. ३१.१२.२०२१ पर्यंत सादर करण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या. तथापी त्यानुसार अद्याप पर्यंत कोणत्याही उमेदवाराचे आक्षेप या कार्यालयास प्राप्त झालेले नाही. आता पुनश्चः दिनांक १०.०१.२०२१ पर्यंत या वॉटस्पप नंबर वर -> ९४२०७२०८७८ आपले आक्षेप मागविण्यात येत आहे. तसेच नागपुर जिल्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळेतील मुख्याध्यापकांना सुचीत करण्यात येते की, आपणांकडून प्राप्त माहितीच्या आधारे शाळा निहाय अनुकंपा तत्वावर नेमणुकी करीता आवेदन सादर केलेल्या उमेदवाराची प्रतिक्षा यादी आपल्या वॉटसप गृपवर टाकण्यात आली आहे. सदर यादी आपल्या शाळेतील संबंधित अनुकंपा उमेदवारांच्या निर्देशनास आणून द्यावी तसेच या बाबत त्यांचे काही आक्षेप असल्यास उपरोक्त  व्हाट्सअप नंबरवर तक्रार /आक्षेप  पाठविण्याबाबत संबंधित उमेदवारास सूचना देण्याची कारवाई करावी.