डॉक्टरवर केलेल्या हल्ल्याचा ClTU तर्फेजाहिर निषेध

152

विदर्भ वतन न्यूज पोर्टल नागपूर

आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू) तर्फे खंडाळा, ता.नरखेड येथे 15 -18  वयोगटातील मुलाच्या कोविड लसीकरणाच्या वेळी आरोग्य कर्मचारी बंधु-भगिनी व वाहन चालक यांना विकृत मानसिकता असलेल्या सरपंचा कडुन मारहाण करुन MO व कर्मचा-यांना शिविगाळ करण्यात आली. त्याचा निषेध व संबधित दोषी विरुध्द कठोर कार्यवाही व्हावी म्हणून आज गुरूवारी संपुर्ण जिल्हा सर्व 13 तालुक्यात सर्व आशावर्कर व गटप्रवर्तक एक दिवस काम बंद आंदोलन करून मारहाण करणाऱ्या सरपंचावर कारवाई करा व सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना सुरक्षा द्या. या मागणीसाठी काम बंद आंदोलन करून जिल्हाधिकारीऱ्याना शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. उपकेंद्र स्तरावरील कोविड19 लसिकरण कोविशिल्ड व कोव्हॅसिन पुर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय सर्व संघटनेच्या वतीने घेण्यात आला. यावेळी सर्व आरोग्य सेवक, नर्सेस, आशा वर्कर, गटप्रवर्तक यांनी सहभागी झाल्या.
आशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियन (सीआयटीयू)
अध्यक्ष
राजेंद्र साठे
९८९००९०१०७