
विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;
नागपूर: (दिनांक ६ जानेवारी)
ज्येष्ठ समाजसेविका व अनाथाची माय पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मनसे…….
संपूर्ण महाराष्ट्रात अनाथांची माय, दिनदुबल्याचा आधार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माई उर्फ पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, मनसे प्रणित महिला सेनेच्या वतीने नागपुरातील सक्करदरा चौक बुधवार बाजार येथे सिंधूताई सपकाळ यांना श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, मनसेचे प्रदेश सरचिटणीस हेमंत गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन महिला सेनेच्या शहर अध्यक्ष मनीषा पापडकर यांनी केले. त्यांनी सुरुवातीला या विषयाचे प्रास्ताविक केले, त्यानंतर हेमंतभाऊ गडकरींनी सिंधुताईंच्या सामाजिक जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला, नंतर सिंधुताईंच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावून व दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सरचिटणीस हेमंत गडकरी व शहराध्यक्ष सौ. मनीषा पापडकर यांचेसह शहर अध्यक्ष विशाल बडगे, शहराध्यक्ष सौ. संगीता सोनटक्के, महिला सेना जिल्हा अध्यक्ष अचला मेसन, मनसेचे उपशहर अध्यक्ष प्रशांत निकम, दक्षिण विभाग अध्यक्ष गौरव पुरी, पूर्व विभाग अध्यक्ष उमेश उत्तखेडे, वाहतूक सेनेचे जिल्हा संघटक सचिन धोटे, शहर सचिव सौ. अर्चनाताई कडू, दक्षिण विभाग अध्यक्ष मंजुषा पाणबुडे, दक्षिण विभाग उपाध्यक्ष अंकित झाडे, सहसचिव स्वाती जयस्वाल, प्रसिद्धी प्रमुख राज अंभोरे, गोकुल वरेकर, राजीव पोलाखरे, शुभम श्रीवास्तव, मयुर बडगे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

