9 जानेवारीला ‘वीर सावरकर – दी मॅन हु कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशन’ या पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन ! ..

160

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

     भारतीय इतिहासात वीर सावरकर आणि त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग विसरता येणार नाही. अंदमानच्या काळकोठडीतील छळयातना सहन करून मातृभूमीसाठी कार्य करणार्‍या वीर सावरकरांच्या नशिबी मात्र उपेक्षाच आली. आजही खोट्या माहितीच्या आधारे अपप्रचार करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. तो रोखण्यासाठी त्याला ऐतिहासिक पुराव्यांसह उत्तर देणे आवश्यक होते, तसेच राजकीय मतभेद दूर सारून सावरकरांना लाभलेल्या दूरदृष्टीचा लाभ करून घेतला असता, तर भारताची फाळणीही टाळता आली असती. या दृष्टीने संशोधन करून केंद्रीय माहिती आयुक्त आणि प्रख्यात लेखक श्री. उदय माहुरकर आणि सहलेखक चिरायू पंडित यांनी ऐतिहासिक पुराव्यांसह सावरकरांच्या जीवनावर नवीन प्रकाश टाकणारे पुस्तक वीर सावरकर दी मॅन हु कुड हॅव प्रीव्हेंटेड पार्टिशनलिहिले आहे. या पुस्तकाचा गोव्यातील प्रकाशन सोहळा रविवारी, 9 जानेवारी 2022 रोजी असणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पणजी येथील एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला म्हापसा, गोवा येथील स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत वाळके आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांचीही उपस्थिती होती.

श्री. रमेश शिंदे पुढे म्हणाले, ‘‘या प्रकाशन सोहळ्याला लेखक आणि केंद्रीय माहिती आयुक्त श्री. उदय माहुरकर, तपोभूमी कुंडई येथील प.पू. ब्रह्मेशानंद स्वामी, मुख्य अतिथी म्हणून मुंबई येथील स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष श्री. प्रवीण दीक्षित (निवृत्त पोलीस महासंचालक, महाराष्ट्र) तसेच हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे हे उपस्थित रहाणार आहेत. गोमंतकातील सावरकरप्रेमी आणि राष्ट्रभक्त नागरिक यांनी या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे, अशी विनंती आहेपत्रकार परिषदेत स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष श्री. प्रशांत वाळके यांनी केंद्रीय माहिती आयुक्त आणि लेखक श्री. उदय माहुरकर यांच्या कार्याविषयी माहिती दिलीनम्र सूचना कार्यक्रम स्थळी कोविड संदर्भात काळजी घेण्याच्या दृष्टीने सरकारने घोषित केलेल्या सर्व नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.

कार्यक्रमाचे स्थळ : गोवा विद्यापीठ, ‘केमिकल सायन्सचे सभागृह, तालिगाव, गोवा.
दिनांक : रविवार, 9 जानेवारी 2022
वेळ : दुपारी 4.30 वाजता 

 

आपला नम्र,
श्री. रमेश शिंदे,
राष्ट्रीय प्रवक्ता, हिंदू जनजागृती समिती,
(संपर्क : 99879 66666)