18 वर्षाखालील मुलांमुलींचे प्रशिक्षण शिबीर संपन्न….

179

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

राजे रघुजीनगर व्हॉलिबॉल क्रीडा मंडळाच्या मैदानावर 18 वर्षाखालील मुलांमुलींचे प्रशिक्षण शिबीर संपन्न….
नुकत्याच झालेल्या ३१ डीसेबर 21 रोजी सायंकाळी नागपूर विभागीय व्हॉलीबॉल संघाचे निवड चाचणी शिबिर घेण्यात आले. याशिबिरातून नागपूर विभागाचा मुलींचा व मुलांचा संघ निवडण्यात आला. निवड चाचणीसाठी आम्हाला शिवसेना नेता सिद्धुजी कोमजवार यांनी खेळाडूंची भोजनाची व निवासाची व्यवस्था करून दिली. त्यांचे सहकार्य व्हॉलीबॉल खेळासाठी सदैव राहत असते प्रशिक्षण शिबिरासाठी शिवछत्रपती अवार्ड सुनील भडांगे वरिष्ठ खेळाडू राजे रघुजी नगर क्रीडा मंडळाचे रेल्वेचे माजी खेळाडू प्रकाश ढोले व रघुजीनगर चे सर्व वरिष्ठ खेळाडू प्रशिक्षण शिबीर यशस्वी करण्यासाठी उपस्थित होते. राजे रघुजीनगर व्हॉलीबॉल क्रीडा मंडळाचे मुलाचे प्रशिक्षक प्रवीण चीलकुलवार व मुलीचे नितीन कानोडे निवड झालेला संघ उस्मानाबाद येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी दि. 2 जानेवारी रोजी रवाना.
महाराष्ट्र शिव माथाडी कामगार सेनेचे शहर अध्यक्ष कोमजवार यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या.