म.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार;

380

विदर्भ वतन न्यूज पोर्टेल नागपूर ;

म.रा.खा.प्रा.शि.से. स. बार्शी शाखेकडून
अनिल बनसोडे (प्र.अ.)यांचा सत्कार
बार्शी न.पा. शिक्षण मंडळाचे कर्तव्यदक्ष,होतकरू,सर्वांना बरोबर घेऊन काम करणारे,उपक्रमशील,स्वभावाने शांत व संयमी ,कुशल प्रशासक,प्रशासनधिकारी मा. अनिल बनसोडे साहेब यांचा महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शहर शाखा बार्शी या संघटनेमार्फत सत्कार करण्यात आला..
नगर पालिका शिक्षण मंडळ बार्शी या ठिकाणी आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवत ४ वर्षाचा काळ विविध उपक्रम राबवून पूर्ण केला त्याबद्दल मा.अनिल बनसोडे साहेबांचा सन्मान  महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शहर शाखा बार्शी यांच्या वतीने शाल व बुके देऊन प्रशासनाधिकारी कार्यालयात करण्यात आला.यावेळी महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती शहर शाखा बार्शी चे पदाधिकारी श्री. बाळासाहेब आवारे,श्रीम.शोभा संचेती,श्री.युवराज जगताप,श्री.अभिमन्यू सातपुते,श्री.ज्ञानेश्वर खुने,श्री. गुरुशांतय्या स्वामी हे संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच श्री.बाबासाहेब शिंदे सर,श्री.आगवणे सर उपस्थित होते. संघटनेच्या वतीने साहेबांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या